Last updated on December 31st, 2024 at 02:58 am
तसेच आता आपण ऑनलाईन अर्ज नवीन पोर्टल https://ladakibahin.maharashtra.gov.in/ द्वारे सुद्धा करू शकता. खाली आणि या पोर्टल वर अर्ज सादर करण्याची नवीन लिंक दिलेली आहे. या लिंक द्वारे आपण सरळ अर्ज दाखल करू शकता.
महाराष्ट्र राज्य सरकार ने आत्ताच लाँच केलेल्या “Mukhyamantri Ladki Bahin Yojana” मध्ये मोठी उपडते समोर आली है. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी २ मोठी घोषणा केली आहे कि आता ह्या योजने ची वयोमर्यादा ६५ वर्षा पर्यंत करण्यात आली आहे. आगोदर वयोमर्यादा ६० वर्षा पर्यंत होती. आणि दुसरी घोषणा हि करण्यात आली आहे कि अर्ज करण्याची मुदत वाडून ३१ ऑगस्ट पर्यंत करण्यात आली आहे. हा निर्णय एकनाथ शिंदे ह्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकी मध्ये करण्यात आलेला आहे. या मोठ्या उपडते ची माहिती, उप मुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत दिली आहे.
तर आता २१ ते ६५ वर्षा पर्यंत चे महिला या योजने साठी पात्र आहेत. ह्या योजने मधून जमिनींबाबतची अट हि काडून टाकण्यात आली आहे. या योजने अंतर्गत कमीत कमी ३ कोटी ते ३.५० कोटी महिलांना लाभ भेटणार आहे.
महिलांच्या सक्षमीकरणासाठी महाराष्ट्र शासनाने ‘माझी Ladki Bahin Yojana’ सुरू केली आहे. या योजनेच्या माध्यमातून महिलांना आर्थिक मदत आणि अन्य लाभ देण्यात येणार आहेत. मुख्यमंत्र्यांनी या योजनेमध्ये नवीन सुधारणा आणि अपडेट्स जाहीर केले आहेत, ज्यामुळे अधिक महिलांना या योजनेचा लाभ मिळू शकेल.
मुख्यमंत्र्यांनी योजनेच्या वयोमर्यादेत सुधारणा करून आता 65 वर्ष करण्यात आली आहे. त्यामुळे 21 ते 65 वयोगटातील महिला या योजनेचा लाभ घेऊ शकतील. अर्ज करण्याची मुदत ३१ ऑगस्ट २०२४ पर्यंत वाढवण्यात आली आहे, त्यामुळे इच्छुक महिलांनी लवकरात लवकर अर्ज करावा.
Table of Contents
Toggleमुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ऑनलाइन अर्ज:
- सर्वप्रथम तुम्हाला योजना अधिकृत वेबसाइट ladakibahin.maharashtra.gov.in वर जाणे आवश्यक आहे.
- पोर्टलवर गेल्यानंतर मेनूमध्ये ‘अर्जदार लॉगिन’ या पर्यायावर क्लिक करा.
- आता तुमच्यासमोर नवीन पृष्ठ उघडेल, येथे तुम्हाला सर्वप्रथम योजना साठी नोंदणी करावी लागेल.
- नोंदणी करण्यासाठी तुम्हाला ‘खाते नाही का? खाते तयार करा’ या पर्यायावर क्लिक करावे लागेल.
- त्यानंतर नवीन पृष्ठ उघडेल, येथे तुमची माहिती भरावी लागेल, जसे की नाव, पत्ता, वडील/पतीचे नाव, आधार कार्ड क्रमांक, मोबाईल क्रमांक, गाव, जिल्हा, शहर इत्यादी.
- लाडकी बहीण योजना फॉर्ममध्ये माहिती भरल्यानंतर ‘Accept Terms and Conditions’ या पर्यायावर क्लिक करा आणि कॅप्चा भरून ‘Signup’ बटणावर क्लिक करा.
- लाडकी बहीण योजने साठी नोंदणी झाल्यानंतर तुम्हाला मोबाईल क्रमांक आणि पासवर्ड टाकून वेबसाइटमध्ये लॉगिन करावे लागेल.
- लॉगिन केल्यानंतर मेनूमध्ये ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अर्ज’ या पर्यायावर क्लिक करा.
- त्यानंतर नवीन पृष्ठ उघडेल, येथे तुमचा आधार क्रमांक आणि कॅप्चा भरून ‘Validate Aadhar’ बटणावर क्लिक करा.
- आधार क्रमांक पडताळणीनंतर माझी लाडकी बहीण योजना फॉर्म उघडेल, येथे आधार कार्डवरील माहिती प्रमाणे तुमची माहिती भरावी लागेल, जसे की तुमचे नाव, पत्ता, वडील/पतीचे नाव इत्यादी.
- यानंतर तुम्हाला फॉर्ममध्ये तुमचे बँक खाते तपशील भरावे लागतील.
- सर्व माहिती भरल्यानंतर योजना संबंधित कागदपत्रे आणि लाडकी बहीण योजना हमीपत्र अपलोड करावे लागेल.
- कागदपत्रे अपलोड केल्यानंतर ‘Accept हमीपत्र Disclaimer’ या पर्यायावर क्लिक करून अर्ज सबमिट करा.
या प्रकारे तुम्ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने साठी ऑनलाइन अर्ज करू शकता.
Ladki Bahin Yojana अर्ज प्रक्रिया:
महिलांना ‘नारी शक्ती दूत’ अँपवर ‘मुख्यमंत्री-Ladki Bahin Yojana’ योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. या अर्ज प्रक्रियेमध्ये सहजता आणि सोयीस्करता यावर भर देण्यात आला आहे. अर्जाची सुरुवात १ जुलैपासून झाली आहे आणि शेवट तारीख १५ जुलै आहे.
अर्ज प्रक्रिया टप्पे:
- प्रारंभिक निवड यादी प्रकाशित: १६ ते २० जुलै.
- हरकत, तक्रार करण्याची प्रक्रिया: २१ ते ३० जुलै.
- अंतिम निवड यादी प्रकाशित: १ ऑगस्ट.
- लाभ देण्याची सुरुवात: १४ ऑगस्टपासून.
आर्थिक लाभ:
Mukhyamantri Ladki Bahin Yojana च्या माध्यमातून महिलांना महिन्याकाठी १ हजार ५०० रुपये मिळणार आहेत. हा आर्थिक लाभ महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. लाभार्थी महिलांना 15 दिवसांच्या आत त्यांच्या गावातील महा-इ-सेवा केंद्रावर जाऊन अर्ज करता येईल.
पात्रता निकष:
- महिला महाराष्ट्र राज्याची रहिवासी असणे आवश्यक.
- विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त्या, निराधार महिला या योजनेचा लाभ घेऊ शकतात.
- अर्ज करणाऱ्या महिलांचे वय किमान २१ वर्ष पूर्ण व कमाल 65 वर्ष असावे.
- अर्ज करणाऱ्या महिलांचे बँक खाते असणे आवश्यक आहे.
- अर्जदार महिलेच्या कुटुंबांचे एकत्रित वार्षिक उत्पन्न २ लाख ५० हजारांपेक्षा जास्त नसावे.
- अन्य विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे दीड हजार रुपयांपेक्षा जास्त लाभ घेतला नसेल.
- ट्रॅक्टर वगळून चारचाकी वाहन नावावर नसलेली महिला या योजनेचा लाभ घेऊ शकते.
आवश्यक कागदपत्रे:
- आधार कार्ड आवश्यक.
- राज्याचे अधिवास प्रमाणपत्र अथवा राज्यातील जन्म दाखला.
- बँक खात्याच्या पासबुकच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत.
- पासपोर्ट आकाराचा फोटो, रेशनकार्ड.
- योजनेच्या अटी-शर्तींचे पालन करण्याबाबतचे हमीपत्र.
- उत्पन्नाचा दाखला किंवा पिवळे किंवा केशरी शिधापत्रिका.
- मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज फॉर्म.
अर्ज प्रक्रिया:
महिलांनी ऑनलाईन संकेतस्थळावर किंवा प्रत्यक्ष महा-इ-सेवा केंद्रावर अर्ज दाखल करावा. अर्ज दाखल करताना अर्जदार महिला प्रत्यक्ष उपस्थित राहणे आवश्यक आहे.
निष्कर्ष:
माझी Ladki Bahin Yojana ही महाराष्ट्रातील महिलांसाठी एक महत्त्वपूर्ण योजना आहे. या योजनेच्या माध्यमातून महिलांना आर्थिक मदत मिळून त्यांचे जीवनमान सुधारण्यास मदत होईल. मुख्यमंत्र्यांनी केलेल्या सुधारणा आणि नवीन अपडेट्समुळे अधिक महिलांना या योजनेचा लाभ घेता येईल. त्यामुळे इच्छुक महिलांनी लवकरात लवकर अर्ज करून या योजनेचा लाभ घ्यावा.