Last updated on April 3rd, 2025 at 11:49 am
ZP Osmanabad Bharti Result: धाराशिव जिल्हा परिषदेअंतर्गत सन 2023 साठी सरळसेवा पदभरतीची जाहिरात क्र. 01/2023, दिनांक 05.08.2023 नुसार विविध संवर्गातील 453 पदांची भरती प्रस्तावित करण्यात आली होती. यामध्ये कंत्राटी ग्रामसेवक संवर्गातील 33 पदांच्या भरतीसाठी IBPS मुंबईमार्फत आयोजित ऑनलाईन परीक्षेच्या निकालानुसार, कागदपत्र पडताळणीसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी जिल्हा परिषदेच्या www.osmanabad.gov.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. सदर यादीनुसार उमेदवारांची कागदपत्र पडताळणी दिनांक 05.09.2024 रोजी घेण्यात आली.
कागदपत्र पडताळणीसाठी बोलावलेल्या 79 उमेदवारांपैकी 67 उमेदवारांनी हजेरी लावली, तर 12 उमेदवार अनुपस्थित राहिले. कागदपत्र पडताळणीच्या प्रक्रियेनंतर पात्र ठरलेल्या उमेदवारांची अंतिम यादी सोबत प्रकाशित करण्यात येत आहे. या यादीबाबत कोणत्याही उमेदवारांना हरकती अथवा आक्षेप असल्यास, त्यांनी दिनांक 16/09/2024 पर्यंत कार्यालयीन वेळेत आक्षेप सादर करावेत. हरकती सादर करताना समक्ष किंवा dyceo.vpdharashiv@gmail.com या ई-मेलवर दिनांक 23/09/2024 पर्यंत सादर कराव्यात.
विहीत वेळेनंतर आलेल्या हरकतींचा विचार केला जाणार नाही, याची उमेदवारांनी विशेष नोंद घ्यावी.
ZP Osmanabad Bharti Result (ZP Osmanabad Gram Sevak List PDF)
- लाडका शेतकरी योजनेचा मोठा फायदा: शेतकऱ्यांना मिळणार ६ हजारांची थेट मदत – Ladka Shetkari Yojana
- Tatkal Ticket Booking Timing बदलले का? जाणून घ्या सध्या लागू असलेले वेळापत्रक आणि खरे अपडेट्स!
- ZP Parbhani Bharti: नवीन 111 रिक्त पदांसाठी भरती सुरु, तुरंत अर्ज करा
- Study in Australia: ऑस्ट्रेलियात शिकायचंय? तर हे नवे नियम तुम्हाला धक्का देतील!
- NHM Gondia Bharti Result: पात्र अपात्र उमेदवारांची यादी जाहीर