Last updated on December 31st, 2024 at 10:38 pm
ZP Aurangabad Bharti Result: जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगर अंतर्गत विविध संवर्गातील रिक्त पदे भरती करण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. या पदांसाठी आयोजित करण्यात आलेल्या ऑनलाईन परीक्षेचा निकाल आणि गुणपत्रक आय.बी.पी.एस. (I.B.P.S.) कंपनीकडून प्राप्त झाले असून, महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाच्या दिनांक 4 मे 2022 च्या शासन निर्णयानुसार आणि ग्राम विकास विभागाच्या परिपत्रकानुसार कागदपत्रे तपासणीची प्रक्रिया आता सुरु होणार आहे.
सदर कागदपत्रे तपासणीसाठी पात्र उमेदवारांची तात्पुरती यादी जाहीर करण्यात आली आहे. ही यादी जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगरच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे. उमेदवारांनी त्यांच्या कागदपत्रांची तपासणी करण्यासाठी 14 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी 11 वाजता वेरुब सभाग्रह, औरंगपूरा येथे हजर रहावे.
कागदपत्रांची पडताळणी झाल्यानंतर अंतिम निवड यादी तसेच प्रतिक्षा यादी जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर प्रकाशित केली जाईल. यासाठी उमेदवारांनी सर्व आवश्यक कागदपत्रे सोबत आणणे आवश्यक आहे.
ZP Aurangabad महत्त्वाच्या तारखा आणि ठिकाण:
- कागदपत्रे तपासणी दिनांक व वेळ: 14 ऑगस्ट 2024 – सकाळी 11.00 वाजता
- कागदपत्रे तपासणीचे ठिकाण: वेरुब सभाग्रह, औरंगपूरा, जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगर
उमेदवारांनी वरील सर्व तपशीलांची नोंद घ्यावी आणि दिलेल्या वेळेत कागदपत्रांची तपासणी करून घेण्यासाठी हजर रहावे. अधिक माहितीसाठी जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगरच्या aurangabadzp.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.