सध्या सोशल मिडिया वर Tatkal आणि Premium Tatkal तिकिटांच्या बुकिंग वेळांमध्ये बदल झाल्याची अफवा जोरात पसरत आहे. मात्र IRCTC ने यावर स्पष्ट स्पष्टीकरण दिले आहे. त्यांच्या अधिकृत X (पूर्वीचे Twitter) हँडलवर त्यांनी म्हटले आहे:
“Tatkal किंवा Premium Tatkal तिकीटांच्या बुकिंग वेळांमध्ये सध्या कुठलाही बदल प्रस्तावित नाही. हेच वेळापत्रक AC आणि Non-AC दोन्ही वर्गांसाठी लागू आहे. एजंटसाठी निर्धारित वेळाही तशाच राहिल्या आहेत.”
Table of Contents
ToggleTatkal Ticket Booking Timing: जाणून घ्या अचूक वेळा
जर तुम्ही Tatkal तिकीट बुक करणार असाल, तर पुढील माहिती तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे:
- Tatkal Ticket Booking Timing AC क्लासेससाठी (2A, 3A, CC, EC, 3E) – बुकिंग सुरू होते सकाळी 10:00 वाजता (IST)
- Tatkal Ticket Booking Timing Non-AC क्लासेससाठी (SL, FC, 2S) – बुकिंग सुरू होते सकाळी 11:00 वाजता (IST)
- Tatkal तिकीट केवळ प्रवासाच्या एक दिवस आधीच बुक करता येते. प्रवासाच्या दिवशी बुकिंग शक्य नाही.
- First AC क्लास Tatkal योजनेसाठी लागू नाही.
Tatkal Ticket कुठे बुक करता येते?
Tatkal तिकिटे IRCTC च्या अधिकृत वेबसाईट किंवा अॅपद्वारे बुक करता येतात. शेवटच्या क्षणी तिकीट हवे असल्यास ही योजना अत्यंत उपयुक्त आहे. मात्र, Tatkal तिकीटांची संख्या मर्यादित असते आणि त्यांची किंमत सामान्य तिकीटांपेक्षा थोडी जास्त असते.
Tatkal Ticket साठी लागणारे अतिरिक्त शुल्क (Charges)
- Second class – बेसिक भाड्याच्या 10%
- इतर सर्व क्लासेस – बेसिक भाड्याच्या 30%
- यामध्ये किमान आणि कमाल शुल्क मर्यादा लागू असते.
Tatkal तिकीट रद्द केल्यावर काय होते?
जर Tatkal तिकीट confirm झाले असेल आणि तुम्ही ते रद्द केले, तर पैसे परत मिळत नाहीत.
मात्र, वेटिंग लिस्ट Tatkal तिकीट किंवा अपवादात्मक परिस्थितींमध्ये रद्दीकरण केल्यास, रेल्वे नियमांनुसार शुल्क वजा करून परतावा मिळतो.
Tatkal Ticket Booking साठी कोणते Platform वापरावे?
IRCTC ची अधिकृत वेबसाइट (www.irctc.co.in) किंवा IRCTC Mobile App वापरणे हेच सुरक्षित आणि खात्रीशीर आहे. Tatkal योजनेअंतर्गत एका PNR वर जास्तीत जास्त 4 प्रवाशांचे तिकीट बुक करता येते.
Fake Updates पासून सावध राहा!
“Tatkal Ticket Booking Timing मध्ये बदल झाला आहे” असे सांगणाऱ्या अफवांना बळी पडू नका. अधिकृत माहिती फक्त IRCTC कडूनच मिळते. कोणतीही अपुष्ट माहिती सोशल मीडियावरून शेअर न करता, अधिकृत स्त्रोतांवरच विश्वास ठेवा.