Pune Gramin Police Bharti 2024 | लेखी चाचणीचे नवीन वेळापत्रक जाहीर

WhatsApp Channelp Join Now
Telegram Group Join Now

Last updated on July 2nd, 2025 at 10:41 am

MarathiMitraa ला 5 स्टार द्या

Pune Gramin Police Bharti 2024 साठी पोलीस शिपाई चालक भरती २०२२-२३ च्या मैदानी व कौशल्य चाचणी उत्तीर्ण होवून लेखी परिक्षेस पात्र झालेल्या उमेदवारांचा निकाल दिनांक २७/०७/२०२४ रोजी जाहीर करण्यात आला आहे. लेखी परिक्षेस पात्र असलेल्या ५६७ उमेदवारांची परिक्षा दिनांक ०९/०८/२०२४ रोजी घेण्यात येणार आहे. पोलीस शिपाई चालक पदासाठीची ही परिक्षा “सिंहगड टेक्नीकल एज्युकेशन सोसायटी, स.नं. ४४/१, सिंहगड रोड समोर, वडगाव बु. पुणे-४११०४१” या ठिकाणी सकाळी १०.०० वा. आयोजित करण्यात आली आहे. उमेदवारांनी लेखी परिक्षेच्या ठिकाणी दिनांक ०९/०८/२०२४ रोजी सकाळी ०८:०० वा. उपस्थित रहावे.

पुणे ग्रामीण पोलिस लेखी चाचणीचे नवीन वेळापत्रक
पदाचे नावपोलीस शिपाई व चालक
पद संख्या496 जागा
शैक्षणिक पात्रता12th Pass (मूळ जाहिरात वाचावी)
नोकरी ठिकाणपुणे ग्रामीण
वयोमर्यादाखुला वर्ग:- 18 ते 28 वर्षे
मागासवर्गीय:-18 ते 33 वर्षे
अधिकृत वेबसाईटpuneruralpolice.gov.in

महत्त्वाच्या तारखा आणि माहिती

  • निवड प्रक्रिया: मैदानी व कौशल्य चाचणी उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची लेखी परीक्षा घेण्यात येणार आहे.
  • लेखी परीक्षा: ०९/०८/२०२४
  • परीक्षास्थळ: सिंहगड टेक्नीकल एज्युकेशन सोसायटी, वडगाव बु. पुणे
  • उमेदवारांची उपस्थिती वेळ: सकाळी ०८:०० वा.

Pune Gramin Police Bharti 2024 अंतर्गत पोलीस शिपाई आणि पोलीस शिपाई चालक पदासाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांनी या सर्व माहितीची नोंद घ्यावी आणि परीक्षेसाठी पूर्ण तयारी करून उपस्थित राहावे. तसेच, परीक्षेच्या सर्व नियमांचे पालन करावे आणि आपली ओळख पटवण्यासाठी आवश्यक कागदपत्रे सोबत ठेवावी.

शैक्षणिक पात्रता (Educational Qualification)

पोलीस शिपाई पदासाठी:

उमेदवारांनी महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळे अधिनियम, १९६५ (सन १९६५ चा महा.अधिनियम ४१) अन्वये प्रस्थापित केलेल्या विभागीय मंडळाकडून घेण्यात येणारी उच्च माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा (इयत्ता १२ वी) किंवा शासनाने या परीक्षेस समकक्ष म्हणून घोषित केलेली परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. (राष्ट्रीय मुक्त विद्यालय, नवी दिल्ली यांची सिनीयर सेकंडरी स्कूल परीक्षा तसेच सीबीएसई बारावी परीक्षा या दोन्ही परीक्षा ह्या राज्य मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या १२ वी इयत्तेच्या परीक्षेशी समकक्ष आहेत.)

पोलीस शिपाई चालक पदासाठी:

निष्कर्ष

Pune Gramin Police Bharti 2024 च्या अंतर्गत होणाऱ्या लेखी परीक्षेसाठी तयारी करत असलेल्या सर्व उमेदवारांना शुभेच्छा! या परीक्षेच्या माध्यमातून आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी ही एक सुवर्णसंधी आहे. म्हणूनच, पूर्ण तयारी आणि आत्मविश्वासाने परीक्षेला सामोरे जा आणि यशस्वी व्हा!

City Wise Bharti & Yojana

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जिल्हा नुसार जाहिराती

Age Calculator

Age Calculator

Most Recent Posts

Category

विद्या, बातम्या, तंत्रज्ञान आणि इतर सर्वांच्या विषयांवर लेखन करणारी वेबसाईट

Links

© 2024 By Shaker Inamdar