PM Kisan Yojana ही केंद्र सरकारने देशातील शेतकऱ्यांसाठी सुरू केलेली एक महत्त्वाची योजना आहे. या योजनेतून पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी ₹6000 ची आर्थिक मदत तीन समान हप्त्यांमध्ये दिली जाते. सध्या शेतकरी PM Kisan Yojana च्या 20व्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. यासंदर्भात चर्चेला वेग आला असून, तुम्हीही या योजनेचे लाभार्थी असाल तर काही महत्त्वाचे कामे लवकरात लवकर पूर्ण करणे आवश्यक आहे, अन्यथा तुमचा हप्ता रोखला जाऊ शकतो.
PM Kisan Yojana 20वी हप्त्याची अपेक्षित तारीख
अद्याप 20व्या हप्त्यासाठी कोणतीही अधिकृत तारीख जाहीर झालेली नाही. मात्र बातम्यांनुसार 18 जुलै 2025 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी बिहारमधील एका सभेत या हप्त्याची घोषणा करू शकतात. तरीही, अधिकृत पुष्टी होणे बाकी आहे.
मागील हप्ता कधी आला होता?
19वा हप्ता फेब्रुवारी 2025 च्या अखेरीस शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आला होता. दरम्यान 3 महिन्यांच्या अंतराने हप्ते मिळतात, त्यामुळे 20वा हप्ता जुलैच्या मध्यात येण्याची शक्यता आहे.
पुढील हप्ता मिळवण्यासाठी ‘ही’ 3 कामे करा
- भू-सत्यापन अनिवार्य:
आपल्या नावावर शेती जमीन असल्याचा पुरावा देणे आवश्यक आहे. जर हे पूर्ण नसेल, तर हप्ता थांबवला जाऊ शकतो. - ई-केवायसी अपडेट करा:
खाते सुरक्षित ठेवण्यासाठी ई-केवायसी पूर्ण करा. याविना पैसे जमा होणार नाहीत. - बँक खाते आधारशी लिंक करा:
PM Kisan Yojana अंतर्गत हप्ता मिळवण्यासाठी बँक खाते आधार कार्डशी जोडणे आवश्यक आहे.
स्टेटस कसे तपासावे?
शेतकरी PM-Kisan अधिकृत वेबसाइट वर जाऊन आपला आधार किंवा मोबाईल क्रमांक टाकून स्टेटस, पात्रता आणि ई-केवायसी स्थिती तपासू शकतात.
PM Kisan Yojana च्या 20व्या हप्त्याचा लाभ घ्यायचा असेल, तर वरील तीन प्रक्रिया तात्काळ पूर्ण करा आणि पुढील आर्थिक मदतीसाठी पात्र ठरा!