Last updated on June 10th, 2025 at 02:46 pm
Maharashtra Police Bharti 2025: महाराष्ट्र पोलीस दलामध्ये एकूण २,२१,२५९ मंजूर पदांपैकी सध्या ३३,००० हून अधिक पदे रिक्त आहेत. यामध्ये महिला पोलिसांच्या १६.६% पदांचा समावेश असल्याची माहिती पोलीस विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावरून उपलब्ध झाली आहे. आंतरराष्ट्रीय मानकानुसार, १ लाख लोकसंख्येमागे २२२ पोलीस कर्मचारी असणे आवश्यक मानले जाते. या तुलनेत, महाराष्ट्र पोलीस दलात भरती प्रक्रिया वेगाने सुरू करण्याच्या हालचाली दिसत आहेत.
मात्र, भारतातील सरासरी पाहता, प्रत्येक लाख लोकसंख्येमागे केवळ १५२ पोलीस कर्मचारी उपलब्ध आहेत, जे गरजेच्या संख्येपेक्षा ७० ने कमी आहेत. देशभरातील पोलीस रिक्त पदांमध्ये बिहार राज्य आघाडीवर असून तेथे तब्बल ४१% पदे रिक्त आहेत. यामुळेच गुन्हेगारीचे प्रमाण जास्त असल्याचे आढळते. तेलंगणामध्ये २८% रिक्तता आहे, तर महाराष्ट्रात सुमारे १६.३% पदे रिक्त असल्याचे स्पष्ट झाले आहे.
Table of Contents
Toggleनागपूर शहरातील स्थिती
नागपूर पोलीस दलामध्ये काही जागा रिक्त असल्या तरी कायदा व सुव्यवस्थेवर याचा फारसा परिणाम झालेला नाही. “शहरातील पोलीस दल रिक्त पदे भरण्यासाठी प्रयत्नशील आहे, आणि लवकरच भरती प्रक्रिया पूर्ण होईल,” अशी माहिती नागपूर पोलीस आयुक्त निसार तांबोळी यांनी दिली.
Maharashtra Police Bharti 2025: एक सुवर्णसंधी
रिक्त पदे भरण्यासाठी लवकरच मोठ्या प्रमाणावर Maharashtra Police Bharti 2025 ची घोषणा होण्याची शक्यता आहे. ही भरती केवळ पोलिस दलाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी नव्हे तर तरुणांना करिअर घडवण्याची सुवर्णसंधी ठरेल. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी तयारीला लागून महाराष्ट्र पोलीस दलाचा भाग होण्यासाठी या संधीचे सोनं करावे.