Voter ID नसेल तरी टेंशन नको! ‘या’ १२ ओळखपत्रांवरही करू शकता मतदान, Maharashtra Assembly election 2024

WhatsApp Channelp Join Now
Telegram Group Join Now
MarathiMitraa ला 5 स्टार द्या

Maharashtra Assembly election 2024: जर तुमच्याकडे मतदार छायाचित्र ओळखपत्र (Voter ID) नसेल तरी काळजी करू नका! भारत निवडणूक आयोगाने मतदानासाठी १२ प्रकारचे ओळखपत्र ग्राह्य धरले आहेत. बारामती विधानसभा निवडणूक अधिकाऱ्यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, या ओळखपत्रांपैकी कोणताही एक मूळ पुरावा सादर केल्यावर तुम्हाला मतदानाचा अधिकार मिळेल. तसेच, मतदान केंद्रात मोबाईल नेण्यास सक्त मनाई असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

कोणते ओळखपत्र ग्राह्य धरले जाणार?

मतदारांची ओळख पटवण्यासाठी भारत निवडणूक आयोगाने खालील १२ ओळखपत्रांचा स्वीकार केला आहे:

  1. आधार कार्ड
  2. मनरेगा जॉब कार्ड
  3. बँक किंवा पोस्ट ऑफिस पासबुक (छायाचित्रासह)
  4. श्रम मंत्रालयाचे आरोग्य विमा स्मार्ट कार्ड
  5. वाहन चालक परवाना (ड्रायव्हिंग लायसन्स)
  6. पॅन कार्ड (स्थायी खाते क्रमांक)
  7. राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी अंतर्गत दिलेले स्मार्ट कार्ड
  8. भारतीय पारपत्र (पासपोर्ट)
  9. निवृत्ती वेतनविषयक छायाचित्र कागदपत्रे
  10. केंद्र/राज्य शासन, सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम किंवा कंपन्यांचे सेवा ओळखपत्र
  11. संसद, विधानसभा किंवा विधान परिषदेच्या सदस्यांचे अधिकृत ओळखपत्र
  12. दिव्यांगांसाठी सामाजिक न्याय व सशक्तीकरण मंत्रालयाने दिलेले ओळखपत्र

Maharashtra Assembly election 2024 मतदान केंद्रात मोबाईलला बंदी का?

मतदानाच्या गोपनीयतेचे रक्षण करण्यासाठी मतदान केंद्रात मोबाईल नेण्यास मनाई आहे. मतदानाचे छायाचित्र काढणे किंवा चित्रीकरण करणे निवडणूक गुन्हा मानला जातो. यासाठी पुणे जिल्हाधिकारी व जिल्हा दंडाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी मतदान केंद्र व त्याच्या 100 मीटर परिसरात मोबाईलवर बंदी घालण्याचे आदेश दिले आहेत. या नियमांचे उल्लंघन केल्यास भारतीय दंड संहितेच्या कलम 223 नुसार कडक कारवाई होईल.

मतदारांसाठी सूचना

Maharashtra Assembly election 2024 मतदान केंद्रावर अनुचित घटना टाळण्यासाठी मतदारांनी मतदान केंद्रावर नेमलेल्या अधिकाऱ्यांच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे. गोपनीयता भंग होणार नाही याची काळजी घ्यावी, तसेच मतदानासाठी ओळखपत्र घेऊन जाण्याचे

City Wise Bharti & Yojana

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जिल्हा नुसार जाहिराती

Most Recent Posts

Category

विद्या, बातम्या, तंत्रज्ञान आणि इतर सर्वांच्या विषयांवर लेखन करणारी वेबसाईट

 

Products

© 2024 By Shaker Inamdar