4/5 - (1 vote)
IBPS RRB Bharti 2025 अंतर्गत क्षेत्रीय ग्रामीण बँकांमध्ये अधिकारी आणि कार्यालय सहाय्यक या पदांसाठी तब्बल 13,217 रिक्त जागांची मोठी भरती जाहीर झाली आहे. ही भरती पदवीधर तरुण-तरुणींना बँकिंग क्षेत्रात करिअर करण्याची मोठी संधी देणार आहे. अर्जाची अंतिम तारीख आता 28 सप्टेंबर 2025 पर्यंत वाढवण्यात आली असून उमेदवारांना ऑनलाइन अर्ज करण्यासाठी पुरेसा वेळ मिळाला आहे.
IBPS RRB Bharti 2025 – महत्त्वाची माहिती
- एकूण रिक्त पदे: 13,217
- अर्जाची पद्धत: फक्त ऑनलाइन
- अर्ज शुल्क: खुला प्रवर्ग – रु. 850/- | राखीव प्रवर्ग – रु. 175/-
- अर्ज सुरू: 1 सप्टेंबर 2025 पासून
- अंतिम तारीख: 28 सप्टेंबर 2025
- अधिकृत वेबसाईट: www.ibps.in
उपलब्ध पदांची यादी
- कार्यालय सहाय्यक (Multipurpose) – 7972 पदे
- अधिकारी स्केल I (Assistant Manager) – 3907 पदे
- अधिकारी स्केल II (General Banking Officer, Agriculture, IT, Marketing, Law, Treasury, CA) – 1139 पदे
- अधिकारी स्केल III (Senior Manager) – 199 पदे
शैक्षणिक पात्रता
- कार्यालय सहाय्यक (Multipurpose): कोणत्याही शाखेतील पदवी आणि संगणकाचे ज्ञान आवश्यक.
- अधिकारी स्केल I: कोणत्याही शाखेतील पदवीधर, कृषी, व्यवस्थापन, IT, कायदा किंवा वित्त विषयातील उमेदवारांना प्राधान्य.
- अधिकारी स्केल II (Manager): किमान 50% गुणांसह पदवीधर. संबंधित क्षेत्रातील अनुभवास प्राधान्य.
- अधिकारी स्केल III (Senior Manager): उच्च पदवी व अनुभव आवश्यक.
वयोमर्यादा
- कार्यालय सहाय्यक: 18 ते 28 वर्षे
- अधिकारी स्केल I: 18 ते 30 वर्षे
- अधिकारी स्केल II: 21 ते 32 वर्षे
- अधिकारी स्केल III: 21 ते 40 वर्षे
(आरक्षण प्रवर्गासाठी शासकीय नियमांनुसार वयात सवलत लागू राहील.)
निवड प्रक्रिया
- अधिकारी स्केल I: पूर्व परीक्षा + मुख्य परीक्षा + मुलाखत
- कार्यालय सहाय्यक: पूर्व परीक्षा + मुख्य परीक्षा
- अधिकारी स्केल II आणि III: एकच परीक्षा + मुलाखत
IBPS RRB Bharti 2025 – अर्ज कसा करावा?
इच्छुक उमेदवारांनी IBPS च्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन online अर्ज करावा. अधिकृत नोटिफिकेशन व revised schedule PDF देखील तेथे उपलब्ध आहे.