Last updated on December 31st, 2024 at 02:55 pm
General Hospital Gadchiroli Bharti: सामान्य रुग्णालय, गडचिरोली येथे ANM (Auxiliary Nurse Midwife) आणि GNM (General Nursing and Midwifery) या पदांसाठी एकूण 41 रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ठरवलेल्या नियम आणि अटींच्या अधारे अर्ज सादर करावेत. अर्ज करण्यापूर्वी पात्रता, वयोमर्यादा आणि अर्ज प्रक्रियेबाबत सविस्तर माहिती मिळवण्यासाठी हा लेख पूर्ण वाचा.
परिचारिका प्रशिक्षण विद्यालय, सामान्य रुग्णालय, गडचिरोली अंतर्गत विविध पदांची भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीची अधिकृत अधिसूचना परिचारिका प्रशिक्षण विद्यालयाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे. ANM आणि GNM या पदांसाठी एकूण ४१ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने 18 ऑक्टोबर 2024 पर्यंत सादर करावा.
Table of Contents
ToggleGeneral Hospital Gadchiroli Bharti Detail
पदाचे नाव | ANM आणि GNM |
पदसंख्या | Total = 41 ANM = 36 GNM = 5 |
वयोमर्यादा | 17 ते 35 वर्षे |
अर्ज शुल्क | ANM = खुला प्रवर्गासाठी ४०० रुपये, राखीव प्रवर्गासाठी २०० रुपये GNM = खुला प्रवर्गासाठी ५०० रुपये, राखीव प्रवर्गासाठी २५० रुपये |
अर्ज करण्याची पद्धत | Offline |
अर्ज पाठविण्याचा पत्ता | परिचारिका प्रशिक्षण महाविद्यालय, सामान्य रुग्णालय गडचिरोली |
अर्ज करण्याची शेवटची तारीख | 18 ऑक्टोबर 2024 |
Official Website | https://gadchiroli.gov.in/ |
Notification | Click Here |
महत्वाच्या सूचना:
- प्रवेश प्रक्रियेदरम्यान कोणत्याही वादाचा प्रश्न निर्माण झाल्यास, अंतिम निर्णय सक्षम प्राधिकारी म्हणजेच आयुक्त, आरोग्य सेवा, मुंबई यांचा राहील, आणि हा निर्णय सर्व उमेदवारांसाठी बंधनकारक असेल. प्रवेश प्रक्रियेला अंतिम मान्यता आयुक्त, आरोग्य सेवा, मुंबई यांच्या मंजुरीनंतरच दिली जाईल.
- उमेदवारांची निवड त्यांच्या शैक्षणिक गुणवत्ता क्रमांकावर आधारित केली जाईल.
- निवड झालेल्या उमेदवारांनी सलग तीन वर्षांची सेवा देणे अनिवार्य राहील.
- अर्जासोबत जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांचे मागील तीन वर्षांचे एकत्रित मानधन पत्र जोडणे आवश्यक असेल.
- जीएनएमसाठी एएनएम आरक्षणाची निवड एएनएम पात्र उमेदवारांच्या शैक्षणिक गुणवत्तेनुसार केली जाईल.