Last updated on December 31st, 2024 at 07:28 pm
FDA Recruitment 2024: महाराष्ट्र शासनाच्या अन्न व औषध प्रशासन विभागाने FDA भरती २०२४ संदर्भातील अधिसूचना जाहीर केली आहे. वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक आणि विश्लेषणात्मक रसायन शास्त्रज्ञ या पदांसाठी एकूण ५६ जागा भरण्यात येणार आहेत. महाराष्ट्रातील अन्न व औषधांच्या समस्यांचे व्यवस्थापन आणि ग्राहकांचे संरक्षण करण्याची इच्छा असलेल्या व्यक्तींनी २३ सप्टेंबर २०२४ पासून या FDA मेगा भरती २०२४ साठी अर्ज करण्याची संधी मिळाली आहे. ऑनलाइन अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख २२ ऑक्टोबर २०२४ आहे.
Table of Contents
ToggleFDA Recruitment 2024 Details
पदसंख्या | Toal = 56 वरिष्ठ तांत्रिक सहायक पदासाठी – एकूण ३७ जागा विश्लेषण रसायन शास्त्रज्ञ पदासाठी – एकूण १९ जागा |
पदाचे नाव | वरिष्ठ तांत्रिक सहायक आणि विश्लेषण रसायन शास्त्रज्ञ |
Educational qualification | वरिष्ठ तांत्रिक सहायक– या पदासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठाची द्वितीय श्रेणी विज्ञान पदवी. किंवा फार्मसीमध्ये पदवी झालेली असावी विश्लेषण रसायन शास्त्रज्ञ – रसायनशास्त्रातील पदव्युत्तर पदवी किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठातील बायो-केमिस्ट्री पदवी असणे गरजेचे. रसायनशास्त्र किंवा जीव-रसायनशास्त्र यामध्ये पदव्युत्तर पदवी (मास्टर डिग्री) असावी. किंवा कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाच्या द्वितीय श्रेणीतील विज्ञान विषयात पदवी असणे आणि औषधांच्या विश्लेषणामध्ये अठरा महिन्यांपेक्षा कमी कालावधीसाठी अनुभव असणे आवश्यक आहे. |
वयोमर्यादा | १८ ते ३८ वर्षे |
अर्ज शुल्क | अराखीव (खुला) प्रवर्गासाठी १००० रुपये राखीव प्रवर्गासाठी ९०० रुपये |
Pay scale / वेतनश्रेणी | विश्लेषण रसायन या पदासाठी पगार ३८,००० रुपयांपासून सुरु होईल. तो पुढे १,२२,८०० रुपयांपर्यंत जाईल. वरिष्ठ तंत्र या पदासाठी ३५,४०० रुपयांपासून पगार देण्यात येईल. तो पुढे १,१२,४०० रुपयांपर्यंत जाईल. |
अर्ज करण्याची पद्धत | Online |
अर्ज करण्याची शेवटची तारीख | २२ ऑक्टोबर २०२४ |
FDA Recruitment 2024 How To Apply | Apply Now |
विशेष सवलती:
- मागासवर्गीय, खेळाडू, आर्थिक दुर्बल घटक, तसेच सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागास वर्गासाठी वयोमर्यादा ४३ वर्षे असेल.
- दिव्यांग आणि अनाथ उमेदवारांसाठी वयोमर्यादा ४५ वर्षे पर्यंत निश्चित करण्यात आलेली आहे.
- पदवीधर अंशकालीन उमेदवारांसाठी वयोमर्यादा ५५ वर्षे असेल.
- भूकंपग्रस्त उमेदवारांसाठी शासनाच्या निर्णयानुसार वयोमर्यादा ४५ वर्षे असेल.”
FDA Recruitment 2024 साठी अर्ज करण्याची प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे, आणि या संधीचा लाभ घेण्यासाठी इच्छुक उमेदवारांना त्यांच्या पात्रतेनुसार वयोमर्यादेचे नियम लक्षात ठेवणे आवश्यक आहे. वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक व विश्लेषणात्मक रसायन शास्त्रज्ञ पदांसाठी एकूण ५६ जागा उपलब्ध आहेत. ही भरती महाराष्ट्रातील अन्न व औषध प्रशासनात एक महत्वपूर्ण पाऊल आहे, जेणेकरून अन्न आणि औषधांच्या गुणवत्ता आणि सुरक्षिततेच्या बाबतीत प्रगती होईल. उमेदवारांनी अंतिम अर्ज भरण्याची तारीख लक्षात ठेवून तयारी सुरू करावी.