Last updated on July 2nd, 2025 at 11:26 am
देशभरातील लाखो विद्यार्थ्यांना उत्सुकता असलेल्या CUET UG 2025 Answer Key ची प्रतीक्षा आता लवकरच संपणार आहे. 13 मे ते 3 जून 2025 दरम्यान 300 पेक्षा अधिक शहरांमध्ये NTA (National Testing Agency) ने संगणक-आधारित पद्धतीने ही परीक्षा घेतली होती. ही परीक्षा जवळपास एक महिना चालली आणि आता विद्यार्थ्यांचे लक्ष उत्तरतालिकेकडे वळले आहे.
CUET UG ही परीक्षा 205 विद्यापीठांमध्ये अंडरग्रॅज्युएट कोर्सेसमध्ये प्रवेश घेण्यासाठी एक महत्त्वाचा मार्ग आहे. त्यामुळेच परीक्षेनंतर विद्यार्थ्यांना सर्वाधिक वाट पाहावी लागते ती CUET UG Answer Key आणि त्यांच्या response sheet ची!
Table of Contents
ToggleCUET UG 2025 Answer Key कधी जाहीर होणार?
ताज्या माहितीनुसार, CUET UG Answer Key 2025 आणि विद्यार्थ्यांची वैयक्तिक response sheet जून महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात अधिकृत वेबसाइटवर (cuet.nta.nic.in) अपलोड केली जाणार आहे.
विद्यार्थ्यांना त्यांच्या उत्तरांची तपासणी करता यावी यासाठी प्रोव्हिजनल आंसर की (Provisional Answer Key) उपलब्ध करून दिली जाईल. जर एखाद्या प्रश्नाच्या उत्तरावर शंका असेल, तर NTA कडे ऑब्जेक्शन (Objection) देखील नोंदवता येईल.
CUET UG 2025 Answer Key कशी तपासाल?
CUET UG 2025 Answer Key पाहण्यासाठी खालील स्टेप्स फॉलो करा:
- cuet.nta.nic.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
- “Provisional Answer Key (CUET UG 2025)” या लिंकवर क्लिक करा.
- तुमचा Application Number आणि Password वापरून लॉगिन करा.
- लॉगिन केल्यानंतर तुमची response sheet आणि CUET UG 2025 Answer Key डाउनलोड करा.
- जर उत्तरात चूक वाटत असेल, तर ऑनलाईनच ऑब्जेक्शन फॉर्म भरून सबमिट करा.
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची सूचना:
- CUET UG 2025 Answer Key ही तुमच्या निकालाची पहिली झलक असते.
- अंतिम निकाल जाहीर होण्यापूर्वी NTA तक्रारी तपासून Final Answer Key प्रसिद्ध करेल.
- त्यामुळे तुमचे उत्तर नीट तपासा आणि शंका असल्यास ऑब्जेक्शन नोंदवा.