Last updated on July 2nd, 2025 at 11:02 am
MarathiMitraa ला 5 स्टार द्या
Yantra India Recruitment: यंत्र इंडिया लिमिटेड, नागपूरने मेगा भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे, ज्यामध्ये इच्छुक उमेदवारांना शिकण्याबरोबरच उत्पन्न मिळवण्याची एक अनोखी संधी उपलब्ध झाली आहे. या भरती अंतर्गत ‘अप्रेंटिस’ पदांसाठी एकूण 4039 जागांची भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून, अर्ज करण्याची प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन पद्धतीने असेल. उमेदवारांनी लक्षात ठेवावे की ऑनलाइन अर्ज सादर करण्यासाठी पोर्टल ऑक्टोबर २०२४ च्या शेवटच्या आठवड्यात उघडण्याची शक्यता आहे. ही सुवर्णसंधी गमावू नका!
Table of Contents
ToggleYantra India Recruitment 2024
पदाचे नाव | अप्रेंटिस |
पदसंख्या | Total – 4039 नॉन-आयटीआय = 1463 आयटीआय साठी = 2576 |
परीक्षा फी | अर्ज करण्यासाठी कोणतीही परीक्षा फी नाही |
पगार | उमेदवारांना नियमानुसार पगार देण्यात येईल |
नोकरी करण्याचे ठिकाण | नागपूर |
वयोमर्यादा | 14 ते 18 वर्षे |
अर्ज करण्याची पद्धत | Online |
Official Website | https://yantraindia.co.in/ |
Yantra India Recruitment Education Qualification
- नॉन-आयटीआय उमेदवारांनी दहावी परीक्षेत किमान ५०% गुण मिळवलेले असावेत, तसेच गणित आणि विज्ञान या दोन विषयांमध्ये प्रत्येकी किमान ४०% गुण असणे अनिवार्य आहे.
- उमेदवाराने NCVT किंवा SCVT, तसेच कौशल्य विकास मंत्रालय/श्रम व रोजगार मंत्रालयाने जारी केलेल्या राजपत्र अधिसूचनेनुसार मान्यताप्राप्त संस्थेतून संबंधित विभागातील परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी.
- मॅट्रिक्युलेट आणि आयटीआय या दोन्ही परीक्षांमध्ये किमान ५०% गुण आवश्यक आहेत.
- अर्ज सादर करताना उमेदवाराकडे सर्व आवश्यक पात्रता असणे गरजेचे आहे, तसेच अर्ज करण्याची अंतिम तारीख लक्षात ठेवावी.”