भारत सरकारच्या विविध कार्यालयांमध्ये कनिष्ठ अभियंता (Junior Engineer) पदांसाठी मोठ्या प्रमाणावर भरती जाहीर झाली असून, ही भरती Staff Selection Commission (SSC) मार्फत केली जाणार आहे. या भरतीची माहिती SSC ने अधिकृत अधिसूचनेद्वारे प्रसिद्ध केली असून, सिव्हिल, मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकल शाखांमध्ये पात्र उमेदवारांना संधी दिली जाणार आहे. SSC JE Bharti 2025 ही ग्रुप ‘B’ (Non-Gazetted), Non-Ministerial पदांसाठी असून, उमेदवारांना 7व्या वेतन आयोगानुसार लेव्हल 6 म्हणजेच ₹35,400 ते ₹1,12,400 पर्यंत पगार मिळणार आहे. एकूण 1340 पदे या भरतीद्वारे भरली जाणार असून उमेदवारांची निवड संगणक आधारित परीक्षा (Computer Based Exam), कागदपत्र पडताळणी (Document Verification) आणि वैद्यकीय चाचणी (Medical Examination) यांच्या आधारे केली जाईल. ही भरती 2025-2026 शैक्षणिक वर्षासाठी असणार आहे आणि भारतातील कोणत्याही भागात नेमणूक होऊ शकते.
SSC JE Bharti साठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया 30 जून 2025 पासून सुरू होणार असून, अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख 21 जुलै 2025 रात्री 11 वाजेपर्यंत आहे. अर्ज शुल्क भरण्याची अंतिम मुदत 22 जुलै 2025 पर्यंत आहे. या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी मान्यताप्राप्त संस्थेतून संबंधित शाखेतील डिप्लोमा किंवा पदवी प्राप्त केलेली असणे आवश्यक आहे. उमेदवारांचे वय विभागानुसार 18 ते 30 किंवा 32 वर्षांच्या दरम्यान असावे. सर्वसामान्य आणि OBC प्रवर्गातील उमेदवारांसाठी अर्ज शुल्क ₹100 असून SC, ST, महिला आणि अपंग उमेदवारांसाठी शुल्क माफ करण्यात आले आहे. अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी SSC च्या अधिकृत वेबसाइट www.ssc.gov.in वर जाऊन अर्ज सादर करावा.
SSC JE Bharti ( July 2025)
पदाचे नाव | Junior Engineer (Civil, Mechanical and Electrical) |
Vacancy | 1340 |
नोकरी ठिकाण | All Over India |
Age Limit | Up to 30 or 32 |
Educational Qualification | Diploma/ Degree |
Salary | Rs. 35400- 112400/- (Level-6) |
Application Mode | Online |
Application Fees | General/OBC: Rs. 100/- Women candidates, Scheduled Castes (SC), Scheduled Tribes (ST), Persons with Benchmark Disabilities (PwBD) and ExServicemen: No Fees |
अर्ज करण्याची शेवटची तारीख | 21 July 2025 |
Starting Date For Online Application | 30 June 2025 |
जाहिरात | Click Here |
Official Website | https://ssc.gov.in/ |