Last updated on July 2nd, 2025 at 11:10 am
MarathiMitraa ला 5 स्टार द्या
RTE admission documents: शिक्षण हक्क कायद्यानुसार (आरटीई) खासगी शाळांमधील २५ टक्के राखीव जागांसाठीची ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया आज, मंगळवार (१४ जानेवारी) पासून सुरू होणार आहे. पालकांना मुलांचे आरटीई प्रवेश अर्ज २७ जानेवारीपर्यंत भरण्याची संधी मिळेल, अशी माहिती प्राथमिक शिक्षण संचालनालयाचे संचालक शरद गोसावी यांनी दिली आहे.
Table of Contents
Toggleमहत्त्वाच्या सूचना:
- अर्ज एकदाच भरावा: एकापेक्षा अधिक अर्ज भरल्यास एकही अर्ज लॉटरीसाठी विचारात घेतला जाणार नाही.
- शाळांची निवड: पालकांनी विचारपूर्वक दहा शाळांची निवड करावी.
- प्रतीक्षा यादीत नाव: प्रतीक्षा यादीमध्ये नाव असणे म्हणजे प्रवेश निश्चित असा नाही.
- आरटीई पोर्टलवरील सूचनांचे पालन: केवळ मेसेजवर अवलंबून न राहता ‘आरटीई’ पोर्टलवरील सूचनांचे पालन करणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
- चुकीची माहिती: जर पालकांनी चुकीची माहिती भरली तर आरटीई प्रवेश कोणत्याही टप्प्यावर रद्द होऊ शकतो.
- निवासस्थानाचा सुसंगत माहिती: अर्ज भरताना निवासस्थानाचे ठिकाण अचूकपणे नमूद करणे आवश्यक आहे.
RTE Admission Documents:
- जन्म दाखला: ग्रामपंचायत, नगरपालिका, महापालिका, बालवाडीतील रजिस्टर दाखला किंवा पालकांच्या प्रतिज्ञापत्राद्वारे दिलेले स्वयं निवेदन.
- निवासी पुरावा: रेशनकार्ड, वाहन परवाना, वीज बिल, टेलिफोन बिल, प्रॉपर्टी टॅक्सची पावती, घरपट्टी, गॅस बूक किंवा बँक पासबुक.
- उत्पन्न दाखला: एससी, एसटी संवर्गातील पालकांना उत्पन्न मर्यादेची अट नाही, पण जात प्रमाणपत्र आवश्यक आहे.
- घटस्फोटित महिला: न्यायालयाचा घटस्फोट निर्णय, घटस्फोटित महिलेचा किंवा बालकाच्या आईचा रहिवासी पुरावा, वंचित गटातील असल्यास जातीचा प्रमाणपत्र.
- विधवा महिला: पतीचे मृत्यू प्रमाणपत्र, विधवा महिलेचा आणि बालकाचा रहिवासी पुरावा, वंचित घटकातील असल्यास जातीचा दाखला.
- अनाथ, बालक व दिव्यांग बालक: अनाथ मुलांसाठी अनाथालयाची कागदपत्रे किंवा अनाथ नसल्यास, सांभाळ करत असल्याचे हमीपत्र.
RTE Admission Documents योग्य आणि सुसंगतपणे भरल्यास, प्रवेश प्रक्रिया अधिक सुलभ होईल. पालकांनी लक्षपूर्वक अर्ज भरून आवश्यक कागदपत्रे वेळेत अपलोड करणे आवश्यक आहे.
