MarathiMitraa ला 5 स्टार द्या
RCFL Recruitment अंतर्गत राष्ट्रीय केमिकल्स अॅण्ड फर्टिलायझर्स लिमिटेडने (RCFL) 74 रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू केली आहे. ही सुवर्णसंधी ऑपरेटर (केमिकल ट्रेनी), ज्युनिअर फायरमन ग्रेड-III, नर्स ग्रेड-II यांसारख्या विविध पदांसाठी आहे. जर तुम्ही पात्र असाल आणि सरकारी नोकरीच्या शोधात असाल, तर RCFL Recruitment ही तुमच्यासाठी उत्तम संधी ठरू शकते.
RCFL Recruitment 2025
ऑनलाईन अर्जाची अंतिम तारीख: 25 जुलै, संध्याकाळी 5 वाजेपर्यंत
अर्ज सादर करण्याची लिंक: rcfltd.com
आवश्यक शैक्षणिक पात्रता:
- बीएससी (रसायनशास्त्र) किंवा केमिकल इंजिनिअरिंग/टेक्नोलॉजीमधील तीन वर्षांचा डिप्लोमा
- दहावी/SSC उत्तीर्ण आणि फायरमॅन कोर्सचे प्रमाणपत्र
- जनरल नर्सिंग कोर्स UGC मान्यताप्राप्त संस्थेतून
- बीएससी (भौतिकशास्त्र) व एक वर्षाचा डिप्लोमा (मेकॅनिकल/इंजिनिअरिंग)
वयोमर्यादा:
- OBC: कमाल वयोमर्यादा – 33 वर्षे
- SC/ST: कमाल वयोमर्यादा – 35 वर्षे
पगार (Salary):
RCFL Recruitment अंतर्गत निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा किमान ₹18,000 ते ₹60,000 पर्यंत वेतन मिळणार आहे.
निवड प्रक्रिया:
- लिखित परीक्षा: 90 मिनिटांची परीक्षा, 200 गुणांचे 100 MCQ प्रश्न
- प्रश्नांचे दोन भाग: भाग 1 – संबंधित कोर्सविषयक, भाग 2 – एप्टिट्यूड
- स्किल टेस्ट: परीक्षा नंतर पात्र उमेदवारांची कौशल्य चाचणी घेतली जाईल
- नकारात्मक गुणांची अट नाही