Last updated on March 4th, 2025 at 12:49 pm
PCMC Recruitment 2024: पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत दिव्यांग भवन फाउंडेशन पुणेच्या माध्यमातून योग प्रशिक्षक पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे, याबाबतची अधिकृत सूचना जाहीर करण्यात आली आहे. या प्रक्रियेमुळे शिक्षण क्षेत्रात नोकरी करू इच्छिणाऱ्या उमेदवारांना महानगरपालिकेच्या शाळांमध्ये काम करण्याची संधी मिळणार आहे. शिक्षण क्षेत्रात करिअर करण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी ही एक महत्त्वाची आणि सुवर्णसंधी आहे. या भरती प्रक्रियेत एकूण ३३ रिक्त पदांची भरती होणार असून, या पदांसाठी पात्र उमेदवारांसाठी मुलाखतींचे आयोजन करण्यात आले आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी या मुलाखतीत सहभागी होण्याचे आवाहन पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतर्फे करण्यात आले आहे. मुलाखतीची तारीख १६ ऑक्टोबर २०२४ आहे.
PCMC Recruitment 2024 Details
पदाचे नाव | पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत योग प्रशिक्षक |
पदसंख्या | 33 |
नोकरीचे ठिकाण | पुणे |
PCMC Recruitment वयोमर्यादा | १८ ते ४५ वर्षांपर्यंत |
शैक्षणिक पात्रता | किमान १० वी परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी. |
निवड प्रक्रिया | मुलाखत |
मुलाखतीचा पत्ता | उमेदवारांनी प्रत्यक्ष मुलाखतीसाठी नवीन थेरगाव हॉस्पिटल, सेमिनार हॉल, चौथा मजला, जगताप नगर, थेरगाव पोलीस चौकी समोर, थेरगाव पुणे- ४११०३३ |
Salary | योग प्रशिक्षक या पदासाठी योग्य सत्राप्रमाणे पैसे देण्यात येतील. प्रत्येक योगसत्रासाठी २५० रुपये याप्रमाणे पैसे देण्यात येतील. |
मुलाखतीची तारीख | १६ ऑक्टोबर २०२४ |
मुलाखतीची वेळ | सकाळी १० ते ११ |
Official Website | pcmcindia.gov.in |
महत्वाची कागदपत्रे-
– आधार कार्ड ओळखपत्र
– मिनिस्ट्री ऑफ आयुष अथवा योगा सर्टीफिकेशन बोर्ड अंतर्गत नोंदणीकृत संस्थेचे योग प्रशिक्षक असल्याचे प्रमाणपत्र
– १० वी ची मार्कलिस्ट
– शासकीय व खाजगी संस्थेचे अनुभव प्रमाणपत्र
– उमेदवाराकडे नोंदणीकृत नामांकीत योग संस्थेकडील योग प्रशिक्षक असल्याचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.