NHM Aurangabad Result LIVE: राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान (NHM) अंतर्गत छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका येथे विविध रिक्त पदांकरिता भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. दिनांक १९ मे २०२५ रोजी या भरतीसंदर्भातील अधिकृत जाहिरात प्रसिध्द करण्यात आली होती. या भरतीसाठी शहरातील तसेच जिल्ह्यातील विविध पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले होते.
प्राप्त झालेल्या अर्जांची सखोल पडताळणी संबंधित अधिकाऱ्यांकडून करण्यात आली असून, त्यानुसार पात्र व अपात्र उमेदवारांची यादी तयार करण्यात आली आहे. ही यादी आता अधिकृतपणे जाहीर करण्यात आली आहे. ही यादी उमेदवारांनी महानगरपालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर (aurangabadzp.gov.in किंवा संबंधित विभागीय कार्यालयात) तपासावी.
या यादीत उमेदवारांचे नाव, अर्ज क्रमांक, पात्रतेचा दर्जा (पात्र/अपात्र) व अपात्र असल्यास त्याचे कारण स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे. अपात्र ठरलेले उमेदवार आपली हरकत लेखी स्वरूपात निश्चित मुदतीच्या आत कार्यालयात सादर करू शकतात.
ही प्रक्रिया पारदर्शकतेने पार पाडण्यात येत असून, अंतिम गुणवत्ता यादी आणि नियुक्ती प्रक्रियेबाबत लवकरच पुढील सूचना देण्यात येईल. उमेदवारांनी वेळोवेळी अधिकृत वेबसाइटवर भेट देऊन अपडेट तपासावेत.
टीप: यादीबाबत कोणतीही शंका किंवा तक्रार असल्यास उमेदवारांनी महानगरपालिका आरोग्य विभागाशी संपर्क साधावा.
NHM Aurangabad Result Download
Download Eligible/ Non-Eligible Candidates