MSRTC Bharti 2025: राज्यातील बेरोजगार युवकांसाठी एक मोठी संधी समोर येत आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात (MSRTC) तब्बल 29,000 हून अधिक पदे रिक्त आहेत आणि त्यामुळे लवकरच MSRTC Bharti 2025 ची प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता आहे. ही भरती मोहीम राज्यभरात मोठ्या प्रमाणावर पार पडणार असल्यामुळे इच्छुक उमेदवारांनी सज्ज रहावे.
MSRTC Bharti 2025
सध्या MSRTC मध्ये ८६,५६२ कर्मचारी कार्यरत आहेत, परंतु शासनाच्या मंजूरीनुसार ही संख्या १,२५,८१४ पर्यंत असावी, यामुळे जवळपास २९,३६१ पदे अजूनही रिक्त आहेत. या रिक्त जागांमध्ये वाहक (Conductor), चालक (Driver), लिपिक, यांत्रिक (Mechanic), वाहतूक नियंत्रक (Traffic Controller) यांसारख्या महत्त्वाच्या पदांचा समावेश आहे.
ही रिक्त पदे भरली गेली नाहीत तर, कार्यरत कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त कामाचा बोजा पडतो. सण-उत्सवांच्या काळात या कर्मचाऱ्यांना डबल ड्युटी करावी लागते. त्यामुळे कामाच्या गुणवत्तेवर परिणाम होतो, शिवाय प्रवाशांना देखील अडचणींचा सामना करावा लागतो.
MSRTC Bharti 2025 अंतर्गत ही सर्व पदे भरून महामंडळाला पूर्ववत सक्षम बनवण्याचा शासनाचा मानस आहे. परिवहन मंत्र्यांनी सर्व जिल्ह्यांतील रिक्त पदांचा आढावा घेऊन आवश्यक पदांसाठी मागणी करण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत.
रत्नागिरीसारख्या जिल्ह्यांमध्ये नोकरीची संधी कमी असल्याने अनेक कर्मचारी मुंबई, पुणे आणि इतर शहरांमध्ये जाऊन सेवा देत आहेत. या भरतीमुळे स्थानिकांना त्यांच्या जिल्ह्यांमध्येच नोकरी मिळण्याची संधी प्राप्त होणार आहे.
एसटी कर्मचारी संघटनांकडून हे आरोप करण्यात आले आहेत की, नियोजनाच्या अभावामुळे पदोन्नती आणि सेवाज्येष्ठतेचे नियमही पाळले जात नाहीत, ज्यामुळे हजारो कर्मचाऱ्यांचे नुकसान होत आहे. त्यामुळे MSRTC Bharti 2025 ही केवळ भरती प्रक्रिया न राहता, ती कर्मचाऱ्यांच्या न्यायहक्काची आणि प्रवाशांच्या सोयीसाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरणार आहे.
महत्त्वाचे म्हणजे, ७ जुलै २०२५ रोजी परिवहन विभागाकडून जाहीर करण्यात आले की राज्यभरात लवकरच मेगा भरती होणार आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी अधिकृत वेबसाईटवर लक्ष ठेवावे व आवश्यक कागदपत्रांची तयारी ठेवावी.