महाराष्ट्रातील लाखो बेरोजगार युवकांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी आहे. Mruda Jalsandharan Vibhag Recruitment अंतर्गत जलदगतीने मोठ्या भरती प्रक्रियेचा मार्ग मोकळा झाला आहे. राज्यातील मृद व जलसंधारण विभागामार्फत तब्बल ८,७६७ नवीन पदांची भरती करण्यासाठी आकृतीबंध तयार करण्यात आला होता, आणि या सर्व पदांना आता हाय पॉवर कमिटीची मान्यता देखील मिळाली आहे.
मृद व जलसंधारण मंत्री मा. संजय राठोड यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही भरती प्रक्रिया लवकरच महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) राबविण्यात येणार आहे. त्यामुळे MPSC ची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी ही एक सुवर्णसंधी ठरणार आहे.
Table of Contents
ToggleMruda Jalsandharan Vibhag Recruitment मध्ये कोणकोणती पदे?
राज्य शासनाच्या १५० दिवसांच्या कृतीबद्ध कार्यक्रमाचा भाग म्हणून, दि. 24 December 2024 रोजी मा. जलसंधारण मंत्री यांनी ३ हजार नव्या पदांची भरती तातडीने जाहीर केली आहे. यामध्ये स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक (Civil Engineering Assistant) सवर्गातील सर्व रिक्त पदांचा समावेश असून, ही भरती सरळसेवा प्रक्रियेद्वारे केली जाणार आहे.
भरती प्रक्रिया कशी राबवली जाणार?
- सर्व पदांची निवड प्रक्रिया MPSC मार्फत पार पडेल.
- स्थापन्य अभियांत्रिकी सहाय्यक पदांसाठी बाह्य एजन्सीचा वापर न करता, सार्वजनिक बांधकाम आणि जलसंपदा विभागांप्रमाणेच निवड होईल.
- पदांची जाहिरात लवकरच प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे, त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी तयारी सुरू ठेवावी.
उमेदवारांसाठी महत्त्वाची सूचना
ही भरती Mruda Jalsandharan Vibhag Recruitment अंतर्गत होत असून, सरकारी नोकरीची वाट पाहणाऱ्या हजारो युवकांसाठी ही एक मोठी संधी आहे. ही भरती पूर्णपणे पारदर्शक पद्धतीने व नियमानुसार पार पाडली जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
निष्कर्ष
जर तुम्ही स्थापत्य अभियांत्रिकी किंवा जलसंधारण क्षेत्रात काम करण्यास इच्छुक असाल, तर Mruda Jalsandharan Vibhag Recruitment ही भरती तुमच्यासाठी उत्तम संधी ठरू शकते. लवकरच जाहिरात प्रसिद्ध होईल, त्यामुळे MPSC व तांत्रिक विषयांची तयारी सुरू ठेवा, आणि सरकारी नोकरीचे स्वप्न साकार करण्याची संधी गमावू नका!