MHT CET 2025 साठी नोंदणी प्रक्रिया सुरू झाली आहे. या परीक्षेसाठी अर्ज प्रक्रिया इंजिनीअरिंग, फार्मसी, कृषी शिक्षण, बी. प्लॅनिंग, तंत्रविषयक, वैद्यकीय आणि व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी आवश्यक आहे. विद्यार्थ्यांना या परीक्षांसाठी ३० डिसेंबर २०२४ ते १५ फेब्रुवारी २०२५ पर्यंत नोंदणी करण्याची मुदत देण्यात आली आहे.
राज्य सीईटी कक्षाने एMHT CET 2025 साठी संभाव्य वेळापत्रक जाहीर केले आहे. या वेळापत्रकानुसार परीक्षांचे आयोजन मार्च-एप्रिल २०२५ मध्ये होईल. विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी तयारीसाठी वेळ मिळावा, यासाठी सीईटी कक्षाने अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया टप्प्याटप्प्याने सुरू केली आहे.
दुसऱ्या टप्प्यात, 25 डिसेंबर 2024 पासून एमएड, एमपीएड, एमबीए, एमएमएस यासारख्या व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी अर्ज स्वीकारले जात आहेत. त्यानंतर, 27 डिसेंबर 2024 पासून विधी तीन वर्षे अभ्यासक्रमासाठी अर्ज सुरू झाले होते. आता, 30 डिसेंबर 2024 पासून इंजिनीअरिंग, फार्मसी, कृषी शिक्षण आणि बी. प्लॅनिंग या अभ्यासक्रमांसाठी एमएचटी सीईटी 2025 साठी अर्ज स्वीकारले जात आहेत. अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत 15 फेब्रुवारी 2025 आहे.
विविध परीक्षा गटांची नोंदणी टप्प्याटप्प्याने सुरू असून, अर्ज दाखल करणाऱ्यांना नियमित शुल्क भरावे लागेल. मात्र, १६ ते २२ फेब्रुवारी २०२५ या कालावधीत विलंब शुल्क भरूनही अर्ज करता येतील.
MHT CET 2025 साठी संभाव्य परीक्षा कालावधी:
- एमएचटी सीईटी (पीसीबी) गटाची परीक्षा 9 ते 17 एप्रिल 2025 दरम्यान
- एमएचटी सीईटी (पीसीएम) गटाची परीक्षा 14 ते 27 एप्रिल 2025 दरम्यान होण्याची शक्यता आहे.
अधिक माहितीसाठी आणि अर्ज करण्यासाठी सदस्यत्व संकेतस्थळ भेट देऊ शकता.
एमएचटी सीईटी 2025 साठी नोंदणी संख्या: दरवर्षी सुमारे सहा लाखांपेक्षा जास्त विद्यार्थी एमएचटी सीईटीसाठी नोंदणी करतात. 2024-25 शैक्षणिक वर्षासाठी, 7,25,938 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 6,75,444 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली.
- Sindhudurg Talathi Bharti Result 2025: पात्र अपात्र उमेदवारांची यादी जाहीर
- NHM Maharashtra: राष्ट्रीय आरोग्य अभियान भरती आणि Result बद्दल माहिती
- Republic Day Speech in Marathi: 26 जानेवारीला होईल टाळ्यांचा कडकडाट, प्रजासत्ताक दिनासाठी प्रभावी भाषण