राज्यात उच्च शिक्षणाच्या क्षेत्रात एक मोठी संधी निर्माण झाली आहे – Maharashtra Teacher Mega Bharti चा निर्णय आता शासनाच्या स्तरावर अंतिम करण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत Maharashtra Teacher Mega Bharti संदर्भातील अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत.
राज्यातील अकृषी सार्वजनिक विद्यापीठे आणि अशासकीय अनुदानित महाविद्यालयांमध्ये हजारो शिक्षक व शिक्षकेतर पदे रिक्त होती. यामुळे शिक्षणाच्या गुणवत्तेवर परिणाम होत होता. ही परिस्थिती लक्षात घेऊन राज्य सरकारने Maharashtra Teacher Mega Bharti साठी पुढाकार घेतला आहे. या अंतर्गत 5000+ सहाय्यक प्राध्यापक आणि 2200+ शिक्षकेतर पदांची भरती करण्यात येणार आहे.
Table of Contents
ToggleMaharashtra Teacher Mega Bharti
मुख्यमंत्री फडणवीस यांनी अभियांत्रिकी अनुदानित संस्थांमध्ये 100 टक्के पदभरतीस मान्यता दिली आहे. तसेच अशासकीय महाविद्यालयांमधील ५०१२ सहाय्यक प्राध्यापक पदे, विविध विद्यापीठांतील 788 अध्यापन पदे आणि 2242 शिक्षकेतर पदे भरण्यास हिरवा कंदील दिला आहे. या निर्णयामुळे Maharashtra Teacher Mega Bharti ही एक ऐतिहासिक भरती मोहीम ठरणार आहे.
विशेषतः लक्ष्मीनारायण अभिनव तंत्रज्ञान विद्यापीठात 105 अध्यापक व एक शिक्षक समकक्ष पदे, तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठात 603 पदांच्या आकृतीबंधास मान्यता देण्यात आली आहे. या दोन्ही संस्थांना दैनंदिन व प्रशासकीय खर्चासाठी 08 कोटी रुपये अनुदान देण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे.
याशिवाय ग्रंथालय क्षेत्रासाठी सुद्धा मोठे निर्णय घेण्यात आले आहेत. ग्रंथालय अनुदानात ४०% वाढ करण्यास मुख्यमंत्री फडणवीस यांनी मान्यता दिली असून, ‘अ’, ‘ब’, ‘क’, ‘ड’ श्रेणीतील ग्रंथालयांच्या तपासणीद्वारे श्रेणीवाढीचा प्रस्ताव वित्त विभागाकडे पाठवण्यात येणार आहे. तसेच 50, 75, आणि 100 वर्षे पूर्ण करणाऱ्या ग्रंथालयांना विशेष प्रोत्साहनपर अनुदान देण्यात येणार आहे.
या Maharashtra Teacher Mega Bharti संदर्भात झालेल्या बैठकीत उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, अपर मुख्य सचिव वेणूगोपाल रेड्डी, वित्त सचिव ओ.पी. गुप्ता, नियोजन सचिव राजगोपाल देवरा यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्राची गरज अधोरेखित करत, राज्यात स्वतंत्र ‘विज्ञान व तंत्रज्ञान विभाग’ स्थापन करण्यासंदर्भात अभ्यास करून प्रस्ताव मांडण्याचे निर्देश दिले. यामुळे भविष्यात शैक्षणिक आणि वैज्ञानिक संशोधनाच्या दृष्टीने राज्याला मोठा फायदा होईल.
निष्कर्ष:
Maharashtra Teacher Mega Bharti ही राज्यातील शिक्षण व्यवस्था सुधारण्यासाठी घेतलेली एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. या भरतीद्वारे हजारो उमेदवारांना नोकरीची संधी उपलब्ध होणार असून, उच्च शिक्षण संस्थांमध्ये गुणवत्तेचा स्तरही वाढणार आहे. जर आपण शिक्षक किंवा शिक्षकेतर पदासाठी तयारी करत असाल, तर ही भरती तुमच्यासाठी सुवर्णसंधी ठरू शकते.