महाराष्ट्रातील महिला उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे! Maharashtra SRPF Female Bharti प्रक्रियेत आता महिलांनाही संधी मिळणार आहे. अनेक वर्षांपासून महिला उमेदवारांना SRPF भरतीत संधी मिळत नव्हती, यावर विधान परिषदेमध्ये आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी आवाज उठवला होता. त्यांनी सांगितले की, महिला आजच्या घडीला पोलीस दलात पुरुषांइतक्याच सक्षमपणे सेवा बजावत आहेत, तसेच त्यांनी भारतीय सैन्यातही आपली कुवत सिद्ध केली आहे.
Maharashtra SRPF Female Bharti
या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मक निर्णय घेत Maharashtra SRPF Female Bharti ला अधिकृत मान्यता दिली आहे. Nagpur SRPF गटात महिला युनिट स्थापन करण्यास मंजुरी देण्यात आली असून, यासाठी तब्बल 144 नवीन कायमस्वरूपी पदे निर्माण करण्यात आली आहेत. लवकरच या भरतीसाठी प्रक्रिया सुरू केली जाणार आहे, ज्यामध्ये महिलाही आता अर्ज करू शकतील.
याशिवाय, उमेदवारांना एकाहून अधिक जिल्ह्यांसाठी अर्ज करता यावा, अशी मागणीही मोहिते-पाटील यांनी केली. मात्र, यावर उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले की, मैदानी चाचणीसाठी वेळ लागतो आणि संपूर्ण भरती प्रक्रिया नियोजनबद्धपणे पार पाडण्यासाठी एका घटकापुरताच अर्ज स्वीकारणे आवश्यक आहे.
Maharashtra SRPF Female Bharti ही संधी महिला उमेदवारांसाठी एक नवा अध्याय ठरणार आहे. जर तुम्ही पोलीस सेवेत सामील होण्याचे स्वप्न पाहत असाल, तर ही वेळ आहे तुमचं स्वप्न पूर्ण करण्याची! अधिकृत जाहिरात आणि अर्ज प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे.