Last updated on July 8th, 2025 at 11:55 pm
Mahaarogya Arogya Vibhag Bharti 2025 साठी मोठी भरती होणार असून, ही बातमी सर्व शासकीय नोकरीच्या इच्छुकांसाठी सुवर्णसंधी ठरू शकते. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य खात्यांतर्गत असलेल्या विविध रुग्णालये आणि आरोग्य केंद्रांमधील हजारो पदे गेल्या अनेक वर्षांपासून रिक्त आहेत. आता या रिक्त पदांची भरती करण्यासाठी महापालिकेने हालचाली सुरू केल्या आहेत.
महानगरपालिकेच्या एकूण आस्थापना अनुसूचीमध्ये 1,45,573 पदांचा समावेश आहे. सध्या यामध्ये केवळ सुमारे 85,000 कर्मचारीच कार्यरत असून उर्वरित 50,000 पेक्षा जास्त पदे रिक्त असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या रिक्त जागांमध्ये परिचारिका, तांत्रिक तज्ज्ञ, डॉक्टर, फार्मासिस्ट, लॅब टेक्निशियन, सफाई कर्मचारी व प्रशासकीय अधिकारी अशा सर्व संवर्गातील पदांचा समावेश आहे.
याशिवाय, भविष्यात 75% पदांवर कंत्राटी पद्धतीने भरती करण्याचा मानस असल्याची माहिती म्युनिसिपल मजदूर युनियनने जाहीर केली आहे. मात्र, अनेक संघटनांनी यावर नाराजी व्यक्त करत, कायमस्वरूपी भरतीची मागणी केली आहे.
Mahaarogya Arogya Vibhag Bharti ही भरती मोहीम फक्त मुंबईत मर्यादित नसून, संपूर्ण महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये आरोग्य सेवांच्या बळकटीसाठी ही प्रक्रिया राबवली जाणार आहे. त्यामुळे, ही संधी ग्रामीण आणि शहरी भागातील उमेदवारांसाठीही महत्वाची आहे.
या भरतीत सहभागी होण्यासाठी उमेदवारांनी संबंधित शैक्षणिक पात्रता, अनुभव, वयोमर्यादा याची माहिती Mahaarogya Arogya Vibhag Bharti 2025 च्या अधिकृत अधिसूचनेतून घेणे आवश्यक आहे. लवकरच अधिकृत जाहिरात प्रसिद्ध होणार असल्याने इच्छुक उमेदवारांनी आपले सर्व कागदपत्र तयार ठेवावीत.
Mahaarogya Arogya Vibhag Bharti महत्त्वाचे मुद्दे:
- बृहन्मुंबई महानगरपालिकेअंतर्गत 50,000+ रिक्त पदांची माहिती
- आरोग्य सेवा कर्मचारी, डॉक्टर्स, तंत्रज्ञ, परिचारिका यांची गरज
- 75% पदे कंत्राटी पद्धतीने भरली जाण्याची शक्यता
- संपूर्ण महाराष्ट्रभर भरती प्रक्रियेचा विस्तार
- अधिकृत अधिसूचना लवकरच जाहीर होण्याची शक्यता
जर तुम्ही शासकीय नोकरीच्या शोधात असाल, तर Mahaarogya Arogya Vibhag Bharti 2025 साठी ही संधी नक्कीच गमावू नका. वेळेत अर्ज करा, अभ्यास सुरु ठेवा आणि शासकीय नोकरीच्या दिशेने एक पाऊल पुढे टाका.