JoSAA Counselling 2025 साठी पात्र विद्यार्थ्यांसाठी एक मोठी अपडेट आहे. IIT, NIT, IIIT यांसारख्या नामांकित संस्थांमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी Joint Seat Allocation Authority (JoSAA) कडून दुसरी Mock Seat Allotment List आज, म्हणजे 11 जून 2025 रोजी जाहीर होणार आहे. या यादीतून विद्यार्थ्यांना त्यांचा JEE Main 2025 मधील रँक आणि निवडीच्या आधारे संभाव्य कॉलेज सीट्स दाखवल्या जातील.
विद्यार्थ्यांना ही मॉक सीट वाटप यादी पाहण्यासाठी अधिकृत वेबसाइट josaa.nic.in या पोर्टलला भेट द्यावी लागेल. JoSAA Counselling 2025 अंतर्गत ही यादी फक्त अंदाजे असून, यानंतर अंतिम Round 1 Seat Allotment Result 14 जून 2025 रोजी प्रसिद्ध होणार आहे.
Table of Contents
ToggleJoSAA Counselling 2025: यंदा वाढले आहेत सीट्स!
यंदाच्या JoSAA Counselling 2025 मध्ये एकूण 62,853 जागा उपलब्ध असून, गेल्या वर्षाच्या तुलनेत 2,916 जागांची वाढ झाली आहे. या प्रक्रियेमुळे अधिक विद्यार्थ्यांना IIT, NIT आणि IIIT सारख्या उच्च दर्जाच्या संस्थांमध्ये प्रवेश घेण्याची संधी मिळणार आहे. याशिवाय, यंदा सात नवीन संस्थांचा समावेश करण्यात आला आहे आणि आता एकूण 128 कॉलेजेसमध्ये प्रवेशासाठी जागा उपलब्ध आहेत.
महत्त्वाच्या तारखा – JoSAA Counselling 2025
- पहिली मॉक सीट वाटप यादी: 9 जून 2025
- दुसरी मॉक सीट वाटप यादी: 11 जून 2025
- नोंदणीची अंतिम तारीख: 12 जून 2025
- Round 1 Seat Allotment Result: 14 जून 2025
JoSAA Mock Seat Allotment 2025 यादी कशी पाहाल?
JoSAA Counselling 2025 अंतर्गत मॉक यादी पाहण्यासाठी पुढील स्टेप्स फॉलो करा:
- JoSAA ची अधिकृत वेबसाइट – josaa.nic.in ला भेट द्या.
- “JoSAA Mock Seat Allotment 2” या लिंकवर क्लिक करा.
- आपला JEE Main Roll Number आणि Password टाका व सबमिट करा.
- तुमच्या स्क्रीनवर मॉक सीट अलॉटमेंट यादी दिसेल.
- यादी काळजीपूर्वक पाहा आणि भविष्यासाठी प्रिंटआउट घ्या.
JoSAA Counselling 2025 का आहे महत्त्वाची?
- IIT, NIT, IIIT आणि GFTI संस्थांमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी JoSAA Counselling ही अत्यंत महत्त्वाची प्रक्रिया आहे.
- ही प्रक्रिया विद्यार्थ्यांना त्यांच्या रँकनुसार योग्य कॉलेज आणि कोर्स निवडण्याची संधी देते.
- मॉक सीट अलॉटमेंटमुळे विद्यार्थ्यांना कल्पना येते की कोणत्या निवडी योग्य आहेत आणि नंतर त्या बदलता येतात.
JoSAA Counselling 2025 ही फक्त एक प्रवेश प्रक्रिया नसून, हजारो विद्यार्थ्यांच्या आयुष्याला दिशा देणारी एक महत्त्वाची पायरी आहे. जर तुम्ही देखील JEE Main 2025 उत्तीर्ण झाले असाल, तर लवकरात लवकर JoSAA पोर्टलवर नोंदणी करून Mock Seat Allotment 2 यादी तपासा आणि तुमच्या स्वप्नातील इंजिनिअरिंग कॉलेजसाठी पहिला टप्पा पार करा!