Jalgaon Rojgar Melava: जळगाव जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना शिक्षण व कौशल्यविकासाच्या क्षेत्रात प्रगती करण्याची महत्त्वाची संधी उपलब्ध होणार आहे. ६ आणि ७ जानेवारी २०२५ रोजी जळगाव जिल्ह्यातील जळगाव रोजगार मेळावा आयोजित करण्यात येत आहे. हा मेळावा जळगाव जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद जळगाव, आणि जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने होईल.
Jalgaon Rojgar Melava Date And Time:
- Date: ६ व ७ जानेवारी २०२५
- Time: सकाळी १०.३० ते दुपारी ०३.००
- Place: Adv. बबन बाहेती ज्यू. कॉलेज, ख्वॉजामिया दर्गा चौक, रोझलँड इंग्लिश स्कूल शेजारी, जळगाव
कार्यक्रमाची रूपरेषा:
१. पहिला दिवस (६ जानेवारी २०२५):
पहिल्या दिवशी, जळगाव रोजगार मेळावा मध्ये विद्यार्थ्यांसाठी व पालकांसाठी करिअर समुपदेशन कार्यक्रम होईल. ९ वी ते १२ वी च्या विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीनुसार करिअर निवडीसाठी तज्ज्ञ मार्गदर्शन देतील. यामध्ये विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा आणि क्षमतांचा आढावा घेतला जाईल.
२. दुसरा दिवस (७ जानेवारी २०२५):
दुसऱ्या दिवशी, जळगाव जिल्ह्यातील विविध उद्योग आणि नियोजकांच्या वतीने रोजगार मेळावा आयोजित केला जाईल. यामध्ये विद्यार्थ्यांच्या मुलाखती घेतल्या जातील, आणि योग्य उमेदवारांना नियुक्ती पत्रे दिली जातील. १२ वी उत्तीर्ण व १८ वर्षे पूर्ण केलेले विद्यार्थ्यांना विविध नोकरीच्या संधी मिळतील.
आयोजकांचे आवाहन:
जळगाव रोजगार मेळावा मध्ये ९ वी ते १२ वी च्या विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घ्या, असे आवाहन जळगाव जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य डॉ. अनिल झोपे यांनी केले आहे.
विशेष सूचना:
उद्योजकांना रिक्त पदांसाठी योग्य उमेदवार शोधण्याची आणि विद्यार्थ्यांना त्यांच्या क्षेत्रात प्रगती करण्याची ही अनोखी संधी आहे.
Jalgaon Rojgar Melava ही नोकरीच्या संधींना गती देण्यासाठी आणि विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन मिळवून देण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरलेली घटना आहे. विद्यार्थ्यांनी या मेळाव्यात भाग घेऊन त्यांच्या करिअरची दिशा निश्चित करावी.