Last updated on December 31st, 2024 at 01:54 am
Indian Bank Recruitment 2024: इंडियन बँकने लोकल बँक ऑफिसर या पदासाठी नवीन भरतीची घोषणा केली आहे. या भरतीत महाराष्ट्रातील विविध शाखांमध्ये एकूण 40 जागा भरल्या जाणार आहेत. या पदासाठी कोणत्याही शाखेतील पदवीधर उमेदवार अर्ज करू शकतात, त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी या संधीचा लाभ घ्यावा. उमेदवारांची निवड प्रक्रिया लेखी परीक्षा, मुलाखत, आणि इतर प्रक्रिया यावर आधारित असेल. निवड झाल्यानंतर उमेदवारांना इंडियन बँकेत स्थानिक बँक अधिकारी म्हणून काम करण्याची संधी मिळणार असून, त्यांना दरमहा ८५,९२० रुपयांपर्यंत वेतन देण्यात येईल. या पदावर नियुक्त झाल्यानंतर उमेदवारांना उत्कृष्ट करिअर वाढीची संधी मिळणार आहे, तसेच बँकिंग क्षेत्रातील अनुभव आणि कौशल्ये मिळवण्याची संधी देखील उपलब्ध होईल.
Indian Bank Recruitment 2024 Details
पदाचे नाव | लोकल बँक ऑफिसर |
रिक्त पदे | Total ३०० रिक्त पदे आहेत आणि त्यापैकी ४० पदे महाराष्ट्र राज्यात आहेत |
महारष्ट्रातील रिक्त पदे | 40 (१७ जाएगा खुल्या वर्गातील उमेद्वारासाठी आणि २३ जाएगा आरक्षित वर्गातील उमेद्वारासाठी) |
वेतन/ मानधन | दर महिना 48,480 ते 85,920 रुपये |
आवेदन करण्याची पद्धत | ऑनलाईन |
शैक्षणिक पात्रता | इंडियन बँकेत लोकल बँक ऑफिसर पदासाठी सुरू असलेल्या भरतीत कोणत्याही शाखेतील पदवी उत्तीर्ण केलेले उमेदवार अर्ज सादर करू शकतात. |
वयोमर्यादा | कमीत कमी २० वर्षे आणि जास्तीत जास्त ३० वर्षे (SC/ST वर्गातील वयाच्या अटीत पाच वर्षांची सूट मिळेल. OBC वर्गातील उमेदवारांना तीन वर्षे अधिक दिली जातील.) |
अर्ज शुल्क | SC/ ST = 175 Open and Other = 1000 |
अर्ज सुरु होण्याची तारीख | १३ ऑगस्ट २०२४ पासून सुरू झाली आहे |
अर्ज करण्याची शेवटची तारीख | २ सप्टेंबर २०२४ |
Official Website (अधिकृत वेबसाईट) | https://www.indianbank.in/ |
Indian Bank Bharti 2024 अंतर्गत लोकल बँक ऑफिसर पदासाठीची भरती उमेदवारांसाठी एक उत्तम संधी आहे. विविध शाखांमध्ये उपलब्ध 40 रिक्त जागांसाठी पात्र उमेदवारांना अर्ज करण्याची आणि बँकिंग क्षेत्रात यशस्वी करिअर घडवण्याची संधी आहे. भरती प्रक्रियेनंतर उमेदवारांना आकर्षक वेतनासह स्थिर नोकरी मिळणार आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी योग्य तयारी करून या संधीचा फायदा घ्यावा.