MarathiMitraa ला 5 स्टार द्या
भारतीय वायुसेनेत सामील होण्याचं स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. Indian Air Force Recruitment 2025 अंतर्गत अग्निवीरवायु पदांसाठी भरती प्रक्रिया आजपासून म्हणजेच 11 जुलै 2025 पासून सुरू झाली आहे. देशसेवेसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांना ही सुवर्णसंधी आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख 31 जुलै 2025 आहे, त्यामुळे विलंब न करता लवकर अर्ज करावा.
पात्रता निकष:
- Indian Air Force Recruitment 2025 अंतर्गत अग्निवीरवायु पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने 12वी उत्तीर्ण असावी. गणित, भौतिकशास्त्र आणि इंग्रजी विषयात किमान 50% गुण आवश्यक.
- अभियांत्रिकी डिप्लोमा (Mechanical/Electronics/Electrical/Automobile/Computer Science) क्षेत्रातील तीन वर्षांचा कोर्सही 50% गुणांसह आवश्यक आहे.
- दोन वर्षांचा गणित व भौतिकशास्त्र विषयांचा व्होकेशनल कोर्स असलेले उमेदवार देखील पात्र आहेत.
- अर्जदाराचे वय 21 वर्षांपेक्षा अधिक नसावे.
अर्ज शुल्क व निवड प्रक्रिया:
या भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांना ₹550 अर्ज शुल्क भरावे लागेल. अर्ज केल्यानंतर उमेदवारांची निवड लिखित परीक्षा, शारीरिक चाचणी, कागदपत्र पडताळणी आणि वैद्यकीय चाचणी यांच्या आधारे केली जाईल.
अर्ज कसा करावा?
इच्छुक उमेदवारांना Indian Air Force Recruitment 2025 साठी अधिकृत वेबसाइटवर agnipathvayu.cdac.in येथे जाऊन ऑनलाइन अर्ज करावा लागेल.