राज्य मंडळाने एक महत्त्वाची घोषणा केली असून, HSC Supplementary Exam Application Form भरण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे. विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर आपले अर्ज ऑनलाइन भरावेत, कारण अर्ज भरण्याची अंतिम तारीख जवळ आली आहे.
HSC Supplementary Exam Application Form
राज्य मंडळाच्या सूचनेनुसार, महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांकडून अर्ज घेऊन त्याचे शुल्क 23 May 2025 रोजीच संबंधित विभागीय मंडळाकडे जमा करणे आवश्यक आहे. त्यानंतर विद्यार्थ्यांच्या नावाच्या याद्या आणि प्री-लिस्ट २६ मे २०२५ रोजी सादर कराव्या लागतील.
HSC Supplementary Exam Application Form भरताना, फेब्रुवारी-मार्च २०२५ मध्ये ज्यांना नापास व्हावे लागले होते, त्यांना त्यांच्या त्या परीक्षेतील तपशील थेट ऑनलाइन अर्जात भरता येणार आहे.
विशेष म्हणजे, श्रेणी सुधारणा आणि गुण सुधारणा योजनेअंतर्गत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना तीन संधी मिळणार आहेत:
- June – July 2025
- February – March 2026
- June – July 2026
राज्य मंडळाने स्पष्टपणे सांगितले आहे की, अर्ज भरण्यासाठी कोणतीही मुदतवाढ दिली जाणार नाही, मग तो नियमित शुल्क असो किंवा विलंब शुल्क.
त्यामुळे, कोणतीही संधी दवडू नका! आत्ताच तुमचा HSC Supplementary Exam Application Form भरून, तुमच्या पुढील संधीसाठी सज्ज व्हा!