महाराष्ट्रच्या तंत्रशिक्षण संचालनालयाने (DTE Maharashtra) DTE Maharashtra Polytechnic Merit List 2025 जाहीर केली आहे. ज्या विद्यार्थ्यांनी या वर्षी पॉलिटेक्निक डिप्लोमा प्रवेशासाठी अर्ज केला होता, त्यांनी आता आपली प्रोव्हिजनल रँक आणि पात्रता तपासण्याची वेळ आली आहे.
ही DTE Maharashtra Polytechnic Merit List अधिकृत वेबसाइटवर म्हणजेच poly25.dtemaharashtra.gov.in वर PDF स्वरूपात उपलब्ध आहे. यामध्ये पात्र उमेदवारांची नावे आणि रँक नमूद करण्यात आलेली आहेत. मागील ट्रेंडनुसार ही यादी दुपारी 5 वाजेपर्यंत प्रसिद्ध होणे अपेक्षित आहे, परंतु काही वेळा तांत्रिक कारणांमुळे ही वेळ रात्री 8 वाजेपर्यंत वाढू शकते.
Table of Contents
ToggleDTE Maharashtra Polytechnic Merit List कशी तपासावी?
पायऱ्या खालीलप्रमाणे आहेत:
- अधिकृत वेबसाइटला भेट द्या – poly25.dtemaharashtra.gov.in
- “Merit List 2025” या लिंकवर क्लिक करा
- आपला कोर्स व संस्थेचा पर्याय निवडा
- स्क्रीनवर Merit List PDF उघडेल
- Ctrl + F वापरून आपले नाव किंवा रोल नंबर शोधा
- PDF डाउनलोड करून प्रिंट काढून ठेवा
थेट लिंक: DTE Maharashtra Polytechnic Merit List 2025 डाउनलोड करा
पुढील काय? (What After Merit List?)
जर यादीत तुमच्या रँकमध्ये किंवा इतर कोणत्याही तपशिलात चूक आढळली, तर तुम्हाला ती ऑनलाइन किंवा ऑफलाइन अर्जाद्वारे दुरुस्त करता येईल.
ऑनलाइन तक्रार नोंदणी:
- अधिकृत पोर्टलवर लॉगिन करा
- आवश्यक शुल्क भरा
- आधारपत्र/डॉक्युमेंट्स अपलोड करा
- वेळेआधी आपली तक्रार सबमिट करा
ऑफलाइन तक्रार नोंदणी:
- जवळच्या Facilitation Centre (FC) ला भेट द्या
- आवश्यक कागदपत्रे द्या
- अcknowledgment slip मिळवा
अंतिम DTE Maharashtra Polytechnic Merit List 7 जुलै 2025 रोजी प्रसिद्ध होईल.
पुढील टप्पा: CAP Round 1 Counseling
DTE Maharashtra Polytechnic Merit List 2025 नंतर पात्र उमेदवारांसाठी Centralized Admission Process (CAP) Round 1 सुरू होईल. याच्या तारखा लवकरच जाहीर केल्या जातील, त्यामुळे अधिकृत वेबसाइटवर नियमित अपडेट्स पाहत रहा.
महत्वाच्या सूचना:
- तुमचा अर्ज क्रमांक आणि लॉगिन तपशील सुरक्षित ठेवा
- वेबसाइटवर नियमितपणे लॉगिन करून अपडेट्स तपासा
- सगळे कागदपत्र योग्य प्रकारे अपलोड केले आहेत की नाही, ते खात्री करा
तुमचा प्रवेश पुढील टप्प्यात यशस्वी होण्यासाठी, DTE Maharashtra Polytechnic Merit List 2025 वर बारकाईने लक्ष ठेवा आणि वेळेत योग्य पावले उचला.
अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाइटला भेट देत रहा: poly25.dtemaharashtra.gov.in