CBSE Supplementary Admit Card 2025: सेंट्रल बोर्ड ऑफ सेकेंडरी एज्युकेशन (CBSE) ने दहावी व बारावीच्या पूरक परीक्षा 2025 साठी प्रवेशपत्र (Admit Card) अधिकृत वेबसाईटवर जाहीर केले आहे. जे विद्यार्थी प्रायव्हेट उमेदवार म्हणून परीक्षा देणार आहेत, त्यांनी CBSE च्या cbse.gov.in या अधिकृत संकेतस्थळावरून आपले CBSE Supplementary Admit Card लगेच डाउनलोड करावेत.
CBSE Supplementary Admit Card 2025
प्रवेशपत्र कसे डाउनलोड करावे?
विद्यार्थ्यांना आपला अर्ज क्रमांक, मागील परीक्षेचा रोल नंबर किंवा आपले नाव, आईचे नाव आणि वडिलांचे नाव टाकून प्रवेशपत्र मिळवता येईल.
रेग्युलर विद्यार्थ्यांचे प्रवेशपत्र कसे मिळेल?
रेग्युलर विद्यार्थ्यांना आपापल्या शाळेमार्फत CBSE Supplementary 2025 Admit Card मिळणार आहे.
CBSE पूरक परीक्षा 2025 कधी होणार?
CBSE बोर्डानुसार, दहावीची पूरक परीक्षा 15 जुलै 2025 रोजी तर बारावीच्या परीक्षा 15 ते 22 जुलै 2025 या कालावधीत घेतल्या जातील. सर्व परीक्षा एकाच शिफ्टमध्ये आयोजित केल्या जाणार आहेत.
पूरक परीक्षेसाठी पात्र कोण?
CBSE बोर्डाने 13 मे 2025 रोजी जाहीर केलेल्या निकालानंतर, जे विद्यार्थी 1 किंवा 2 विषयांमध्ये नापास झाले होते, त्यांना ही संधी मिळते. त्यांना CBSE Supplementary Exam मध्ये बसण्याची परवानगी दिली जाते, जेणेकरून ते आपला निकाल सुधारू शकतील.
महत्त्वाचे:
जर तुम्ही CBSE 10th किंवा 12th Supplementary Exam 2025 साठी पात्र असाल, तर CBSE Supplementary Admit Card 2025 डाउनलोड करणे खूप गरजेचे आहे. परीक्षा हॉलमध्ये प्रवेशासाठी हे आवश्यक आहे.
लवकरच वेबसाईटला भेट द्या आणि तुमचे CBSE Supplementary Admit Card डाउनलोड करा!