महाराष्ट्रातील उमेदवारांसाठी एक आनंदाची बातमी! Bhumi Abhilekh Vibhag Bharti 2025 अंतर्गत भूमि अभिलेख विभागात तब्बल 905 पदांची थेट भरती जाहीर करण्यात आली आहे. ही भरती ग्रुप-सी भूमापक (Land Surveyor) पदांसाठी असून ऑनलाइन अर्ज प्रक्रिया आजपासून सुरु झाली आहे.
Bhumi Abhilekh Vibhag Bharti 2025
राज्यातील सर्व विभागांमध्ये मिळून एकूण 1,160 जागा रिक्त आहेत, त्यापैकी 905 पदे या भरतीद्वारे भरली जाणार आहेत. या भरतीत विभागनिहाय पदांचे वाटप असे आहे –
- पुणे विभाग – 83 पदे
- कोकण (मुंबई) विभाग – 259 पदे
- नाशिक विभाग – 124 पदे
- छत्रपती संभाजीनगर विभाग – 210 पदे
- अमरावती विभाग – 117 पदे
- नागपूर विभाग – 110 पदे
या भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 24 ऑक्टोबर 2025 अशी आहे.
अर्ज कसा करायचा?
उमेदवारांना अर्ज फक्त ऑनलाइन पद्धतीने करावा लागणार असून अर्जासाठी खालील लिंक सक्रिय करण्यात आल्या आहेत –
अर्ज प्रक्रियेसोबतच परीक्षेचे पॅटर्न व अभ्यासक्रम देखील अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध आहे.
परीक्षा कधी होणार?
भू-अभिलेख विभाग भरती 2025 अंतर्गत ऑनलाइन परीक्षा 13 व 14 नोव्हेंबर 2025 रोजी घेण्यात येणार आहे.
महत्त्वाच्या सूचना
- उमेदवारांनी अंतिम तारखेपूर्वी ऑनलाइन अर्ज सादर करावा.
- अर्ज सादर केल्यानंतर त्याची प्रिंट प्रत जतन करून ठेवावी.
- भरतीसंबंधी सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी महा-भूमी मोबाईल App डाऊनलोड करून ठेवणे आवश्यक आहे.