B.Ed अभ्यासक्रमासाठी घेण्यात आलेल्या ‘CET’ परीक्षेचा BEd CET Exam Result अखेर जाहीर झाला आहे आणि हजारो इच्छुक उमेदवारांच्या प्रतीक्षेला पूर्णविराम मिळाला आहे. राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत (State Common Entrance Test Cell) घेण्यात आलेल्या या परीक्षेचा निकाल अधिकृत वेबसाइटवर प्रसिद्ध करण्यात आला आहे.
शिक्षण क्षेत्रात करिअर घडवू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी B.Ed म्हणजेच बॅचलर ऑफ एज्युकेशन हा एक महत्त्वाचा टप्पा असतो. दरवर्षी हजारो विद्यार्थी B.Ed CET परीक्षा देतात. यावर्षी देखील राज्यातील विविध केंद्रांवर ही परीक्षा पार पडली होती आणि आता सर्वांचं लक्ष लागून होतं BEd CET Exam Result कधी लागतो याकडे.
राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाने दिलेल्या माहितीनुसार, निकाल ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध करून देण्यात आला आहे. उमेदवारांना आपला BEd CET Exam Result तपासण्यासाठी अधिकृत वेबसाइटवर जाऊन आपले लॉगिन डिटेल्स वापरून निकाल पाहता येणार आहे. यासाठी CET CELL च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या – cetcell.mahacet.org
BEd CET Exam Result निकाल तपासण्याची प्रक्रिया:
- CET CELL ची अधिकृत वेबसाइट उघडा
- ‘BEd CET 2025 Result’ या लिंकवर क्लिक करा
- आपला लॉगिन आयडी आणि पासवर्ड टाका
- निकाल स्क्रीनवर पाहता येईल
- भविष्यातील वापरासाठी PDF डाउनलोड करून ठेवा
यंदाच्या BEd CET मध्ये अनेक विद्यार्थ्यांनी चांगली कामगिरी केली असून अनेकांना आता विविध बीएड कॉलेजेसमध्ये प्रवेश घेण्याची संधी मिळणार आहे. BEd CET चा हा निकाल पुढील प्रवेश प्रक्रियेसाठी महत्त्वाचा मानला जातो.
BEd CET Exam Result नंतरची पुढील पावले म्हणजे काउंसलिंग, कॉलेज निवड, डाक्युमेंट व्हेरिफिकेशन इत्यादी. त्यामुळे तुम्ही निकालात पात्र ठरलात असल्यास पुढील टप्प्यांची तयारी लगेच सुरु करा.
तुमचा निकाल कसा लागला? तुमचं यश आमच्यासोबत शेअर करा आणि अधिक माहिती, अपडेट्ससाठी आम्हाला फॉलो करत रहा!