सप्टेंबर 2024 मध्ये सुरू झालेला Ayushman Vay Vandana Card आता ज्येष्ठ नागरिकांसाठी एक सुवर्णसंधी ठरत आहे. Ayushman Bharat Pradhan Mantri Jan Arogya Yojana (AB PM-JAY) अंतर्गत सुरू करण्यात आलेला हा उपक्रम, भारतातील 70 वर्षांवरील सर्व नागरिकांना ₹5 लाखांचा मोफत आरोग्य विमा देतो. विशेष बाब म्हणजे यासाठी उत्पन्नाची अट नाही, आणि पूर्वी पात्र असणे गरजेचेही नाही.
Ayushman Card चे खास फायदे (Benefits of Ayushman Card):
- प्रत्येक पात्र नागरिकाला दरवर्षी ₹5 लाखांचा आरोग्य विमा
- 27 वैद्यकीय शाखांमधील 1,961 उपचार प्रक्रियेचे मोफत कव्हरेज
- कोणतीही वेटिंग पिरियड न लागता, सर्व पूर्वस्थित आजार (Pre-existing diseases) पासून संरक्षण
- 30,000 हून अधिक मान्यताप्राप्त रुग्णालयांमध्ये (त्यापैकी 13,352 खाजगी हॉस्पिटल्स) कॅशलेस उपचाराची सोय
Ayushman Vay Vandana Card साठी ऑनलाईन रजिस्ट्रेशन कसे कराल? (How to Apply and Download Ayushman Card):
तुम्ही घरी बसूनही Ayushman Card डाउनलोड करू शकता. खालील स्टेप्स फॉलो करा:
- Google Play Store वरून ‘Ayushman App’ डाउनलोड करा.
- ‘Login as beneficiary’ किंवा ‘operator’ पर्याय निवडा.
- कॅप्चा, मोबाईल नंबर आणि ओटीपी वापरून लॉगिन करा.
- अॅपला तुमचा लोकेशन अॅक्सेस करण्याची परवानगी द्या.
- आधार नंबर आणि राज्य संबंधित माहिती भरा.
- लाभार्थीची माहिती सापडत नसल्यास, eKYC प्रक्रिया पूर्ण करा (OTP द्वारे व्हेरिफिकेशन).
- डिक्लरेशन फॉर्म भरा आणि आवश्यक माहिती द्या.
- मोबाईल नंबर व OTP द्वारे ओळख पटवा.
- पिन कोड आणि कॅटेगरी संबंधित माहिती प्रविष्ट करा.
- कुटुंबातील इतर सदस्यांची माहिती देखील जोडता येईल.
- एकदा eKYC प्रक्रिया पूर्ण झाली की, तुमचा Ayushman Card डाउनलोडसाठी उपलब्ध होईल.
Ayushman Vay Vandana Card का आवश्यक आहे?
आजच्या महागाईच्या काळात उपचार खर्च दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. अशा वेळी Ayushman Card हा एक आर्थिक सुरक्षा कवच ठरत आहे. विशेषतः वृद्ध नागरिकांसाठी हा विमा जीवन वाचवू शकतो.
Ayushman Card विषयी महत्त्वाची माहिती:
मुद्दा | माहिती |
---|---|
योजना नाव | Ayushman Vay Vandana Card |
सुरूवात तारीख | ऑक्टोबर 2024 |
विमा रक्कम | ₹5 लाख प्रतिवर्ष |
पात्रता | 70 वर्षे वय व त्यापेक्षा जास्त (कोणतीही अट नाही) |
लागू रुग्णालये | 30,000+ सरकारी व खाजगी रुग्णालये |
विशेष बाब | सर्व आजार कव्हर, वेटिंग पिरियड नाही |
official website | Click here |
Ayushman Vay Vandana Card बद्दल तुमचे विचार!
तुमच्या आजी-आजोबा किंवा वडिलांना हा लाभ मिळतोय का? तुम्ही अद्याप Ayushman Card डाउनलोड केला नसेल, तर आता वेळ वाया न घालवता लगेच पुढे जा. हा विमा आयुष्यभराचा आधार बनू शकतो.