AIIMS CRE Recruitment 2025 ही भरती प्रक्रिया सुरू झाली असून देशभरातील हजारो उमेदवारांसाठी ही एक सुवर्णसंधी आहे. ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (AIIMS), दिल्ली यांनी Common Recruitment Examination 2025 साठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया 12 जुलैपासून सुरू केली आहे. AIIMS, ESIC, RML हॉस्पिटल्स आणि देशातील इतर नामांकित रुग्णालयांमध्ये सरकारी नोकरी मिळवण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी ही संधी खास आहे.
AIIMS CRE Recruitment 2025 महत्त्वाच्या तारखा:
- अर्ज सुरू होण्याची तारीख: 12 जुलै 2025
- अर्ज करण्याची अंतिम तारीख: 31 जुलै 2025
- अर्जाची स्थिती जाहीर होणार: 7 ऑगस्ट 2025
- परीक्षा तारीख (संभाव्य): 25 व 26 ऑगस्ट 2025
- अॅडमिट कार्ड: परीक्षेपूर्वी 3 दिवस आधी
शैक्षणिक पात्रता:
AIIMS CRE Recruitment 2025 साठी 10वी, 12वी, ITI, डिप्लोमा, ग्रॅज्युएट किंवा इंजिनिअरिंग पदवीधर अर्ज करू शकतात. ही भरती विविध पदांसाठी असून पदानुसार पात्रता वेगळी आहे.
AIIMS CRE Recruitment अर्ज कसा कराल?
- अधिकृत वेबसाइट aiimsexams.ac.in ला भेट द्या.
- ‘Recruitment’ टॅबवर क्लिक करा आणि ‘Common Recruitment Examination (CRE)’ निवडा.
- ‘Create New Account’ वर क्लिक करून तुमचे रजिस्ट्रेशन पूर्ण करा.
- नंतर आवश्यक माहिती भरून अर्ज सबमिट करा.
- वर्गानुसार शुल्क भरून फॉर्म सबमिट करा आणि त्याचा प्रिंटआउट ठेवा.
AIIMS CRE Recruitment अर्ज शुल्क:
- General/OBC: ₹3000
- SC/ST/EWS: ₹2400
- PWD: पूर्णपणे मोफत
AIIMS CRE Recruitment 2025 अंतर्गत देशभरातील नामांकित रुग्णालयांमध्ये नोकरी मिळवण्यासाठी ही एक उत्कृष्ट संधी आहे. जास्त माहिती आणि अचूक मार्गदर्शनासाठी अधिकृत अधिसूचना वाचा आणि लवकरात लवकर अर्ज करा!