धक्कादायक अपडेट! 8,000+ शिक्षक भरतीची तयारी अंतिम टप्प्यात? ‘Maharashtra Shikshak Bharti 2026’ संदर्भातील आतली बातमी वाचा

WhatsApp Channelp Join Now
Telegram Group Join Now
MarathiMitraa ला 5 स्टार द्या

राज्यात शिक्षक होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या उमेदवारांसाठी मोठी आणि दिलासादायक बातमी समोर येत आहे. Maharashtra Shikshak Bharti 2026 अंतर्गत जिल्हा परिषद शाळांमधील हजारो रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया लवकरच सुरू होण्याची शक्यता आहे. सध्या राज्यभरात जिल्हा परिषद शाळांमध्ये तब्बल 15,158शिक्षकांची पदे रिक्त असून, शासन निर्णयानुसार त्यापैकी 80 टक्के म्हणजे सुमारे 8,000 शिक्षकांची भरती केली जाणार आहे.

शालेय शिक्षण विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, २०२५-२६ या शैक्षणिक वर्षाची संचमान्यता आता अंतिम टप्प्यात आहे. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर 15 मार्च 2024 च्या शासन निर्णयानुसार पटसंख्येअभावी अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांचे प्रथम समायोजन करण्यात येणार आहे. त्यानंतरच प्रत्यक्ष भरती प्रक्रिया सुरू होईल. त्यामुळे Maharashtra Shikshak Bharti 2026 फेब्रुवारी-मार्चपासून गती घेण्याची शक्यता तज्ज्ञ व्यक्त करत आहेत.

Maharashtra Shikshak Bharti 2026

दरम्यान, नागपूर येथे पार पडलेल्या हिवाळी अधिवेशनात अनेक आमदारांनी जिल्हा परिषद शाळांमधील गुणवत्तेचा मुद्दा उपस्थित केला होता. शिक्षकांच्या मोठ्या प्रमाणावरील रिक्त पदांमुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर होणारा परिणाम त्यांनी सभागृहात मांडला. याच पार्श्वभूमीवर शिक्षक भरतीचा विषय पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, शासनावर दबाव वाढला आहे.

महत्त्वाची बाब म्हणजे, टीईटी परीक्षेचा निकाल जाहीर झालेला असून भरतीसाठी पात्र उमेदवार उपलब्ध आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची आचारसंहिता संपल्यानंतर रिक्त पदांच्या जाहिराती पवित्र’ पोर्टलवर प्रसिद्ध केल्या जातील आणि संपूर्ण प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने राबवली जाईल. त्यामुळे Maharashtra Shikshak Bharti 2026 अधिक पारदर्शक आणि जलद होईल, असा विश्वास शिक्षण विभागाने व्यक्त केला आहे.

शिक्षकांच्या बदल्यांबाबतही एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. आतापर्यंत जून ते ऑक्टोबरपर्यंत चालणाऱ्या बदली प्रक्रियेमुळे शैक्षणिक गुणवत्तेवर परिणाम होत होता. हे टाळण्यासाठी आता एप्रिल ते जून या कालावधीत जिल्हाअंतर्गत बदल्या पूर्ण केल्या जाणार आहेत, ज्याचा थेट फायदा विद्यार्थ्यांना होणार आहे.

सोलापूरसारख्या जिल्ह्यांमध्येही शेकडो पदे रिक्त असून, पदवीधर शिक्षक आणि मुख्याध्यापकांची कमतरता स्पष्टपणे जाणवत आहे. संचमान्यतेनंतर अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन करून उर्वरित जागांसाठी भरतीची मागणी केली जाणार आहे.

दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाच्या टीईटी संबंधी निर्णयामुळे शिक्षक संघटनांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली होती. यावर राज्य सरकारने हस्तक्षेप याचिका दाखल करण्याची तयारी दर्शवली असून, याबाबतची अधिकृत माहिती मंत्र्यांनी सभागृहात दिली आहे. यामुळे Maharashtra Shikshak Bharti 2026 प्रक्रियेत काही महत्त्वाचे बदल होण्याचीही शक्यता नाकारता येत नाही.

एकंदरीत, शिक्षक भरतीच्या प्रतीक्षेत असलेल्या उमेदवारांसाठी पुढील काही महिने अत्यंत निर्णायक ठरणार आहेत. अधिकृत जाहिरात, जिल्हानिहाय पदसंख्या आणि अर्ज प्रक्रियेच्या अपडेटसाठी Maharashtra Shikshak Bharti 2026 संबंधित बातम्यांवर लक्ष ठेवा.

City Wise Bharti & Yojana

जिल्हा नुसार जाहिराती

Age Calculator

Age Calculator

Most Recent Posts

Category

विद्या, बातम्या, तंत्रज्ञान आणि इतर सर्वांच्या विषयांवर लेखन करणारी वेबसाईट

 

Links

© 2024 By Shaker Inamdar