महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात (MSRTC) लवकरच मोठ्या प्रमाणावर भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. राज्यातील वाढत्या बससेवेला सुरळीत ठेवण्यासाठी MSRTC Bharti 2025 अंतर्गत तब्बल 17,450 चालक व सहाय्यक (कंडक्टर) पदांची भरती होणार आहे.
एसटी महामंडळाकडे सध्या 29 हजारांहून अधिक रिक्त पदे आहेत. त्यात विशेषतः चालक व कंडक्टर या पदांची टंचाई असल्याने विद्यमान कर्मचाऱ्यांवर दुहेरी कामाचा बोजा येत आहे. वाढत्या प्रवासी संख्येमुळे अनेकदा दुहेरी ड्युटी करावी लागते. या पार्श्वभूमीवर परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी लवकरात लवकर भरतीसाठी निविदा प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश दिले आहेत.
Table of Contents
ToggleMSRTC Recruitment 2025 ची महत्त्वाची माहिती
- एकूण पदे: 17,450 चालक व सहाय्यक
- भरती पद्धत: कंत्राटी (Contract Basis)
- कालावधी: ३ वर्षे
- किमान वेतन: सुमारे ₹30,000/- प्रति महिना
- प्रशिक्षण: एसटी महामंडळाकडून उमेदवारांना प्रशिक्षण दिले जाणार
- निविदा प्रक्रिया सुरू होण्याची तारीख: 2 ऑक्टोबर 2025
या भरतीमुळे राज्यातील हजारो बेरोजगार युवक-युवतींना रोजगाराची सुवर्णसंधी उपलब्ध होणार आहे. शिवाय, बसेसच्या वाढत्या संख्येला आवश्यक मनुष्यबळ मिळाल्यानंतर प्रवाशांना दर्जेदार, सुरक्षित व अखंडित बससेवा देणे शक्य होणार आहे.
MSRTC भरतीमुळे स्थानिकांना रोजगाराची संधी
रत्नागिरीसह कोकण विभागात रोजगाराच्या संधी कमी असल्याने अनेक तरुणांना मुंबई, पुणे यांसारख्या शहरांत नोकरीसाठी जावे लागते. पण MSRTC Recruitment 2025 जाहीर झाल्यास “स्थानिकांना प्राधान्य” मिळावे, अशी मागणी होत आहे. यामुळे गावागावातील युवकांना आपल्या जिल्ह्यातच नोकरीची संधी मिळू शकते.
अर्ज कधी आणि कुठे करायचा?
सध्या अर्ज प्रक्रिया सुरू झालेली नाही. MSRTC Recruitment 2025 ची अधिकृत अधिसूचना आणि ऑनलाइन अर्ज लिंक लवकरच महामंडळाच्या अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध होणार आहे. उमेदवारांनी नियमितपणे अधिकृत वेबसाइट तपासावी.