Last updated on December 14th, 2025 at 08:13 pm
राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंतर्गत भारतात पहिल्यांदाच परदेशी विद्यापीठ स्थापन होणार आहे. प्रतिष्ठित University of Southampton in India ने दिल्लीनजिक गुरगाव येथे आपले शैक्षणिक संकुल उभारण्यास सुरुवात केली आहे, ज्यामुळे भारतीय विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाचे शिक्षण भारतातच घेता येणार आहे. या विद्यापीठात प्रवेश प्रक्रियेचा शुभारंभ ऑगस्ट २०२५ मध्ये अपेक्षित असून, त्यासाठी ऑक्सफोर्ड इंटरनॅशनल एज्युकेशन ग्रुपसोबत एक महत्वपूर्ण करार करण्यात आला आहे.
University of Southampton in India
University of Southampton in India हे भारतात स्थापन होणारे पहिले विदेशी विद्यापीठ ठरणार आहे. येथे विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय पातळीवरील प्राध्यापकांकडून चार पदवी आणि दोन पदव्युत्तर अभ्यासक्रमात शिक्षण घेण्याची संधी मिळेल. कमी शुल्कात आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण देणारे हे संकुल संशोधनावर आणि उद्योगांच्या गरजा लक्षात घेऊन तयार केले आहे. यामुळे विद्यार्थ्यांना परदेशात महागड्या शिक्षणासाठी जाण्याऐवजी, भारतातच नाविन्यपूर्ण आणि उच्च दर्जाचे शिक्षण घेता येईल.
विद्यार्थ्यांना जागतिक स्तरावर गुणवत्ता प्राप्त शिक्षण देण्यासाठी ब्रिटन आणि भारतातील उत्तम शैक्षणिक पद्धतींचा समन्वय साधला जाणार आहे. OIEG चे मुख्य कार्यकारी अधिकारी लिल ब्रेमरमन-रिचर्ड यांनी स्पष्ट केले आहे की, भारतीय विद्यार्थ्यांना University of Southampton in India संकुलाच्या माध्यमातून ब्रिटनच्या शिक्षणाचा अनुभव भारतातच मिळवण्याची संधी उपलब्ध होणार आहे, ज्यामुळे त्यांचे परदेशातील शिक्षणाचे स्वप्न इथेच साकार होईल.
