Mahaarogya Arogya Vibhag Bharti 2025 साठी मोठी भरती होणार असून, ही बातमी सर्व शासकीय नोकरीच्या इच्छुकांसाठी सुवर्णसंधी ठरू शकते. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य खात्यांतर्गत असलेल्या विविध रुग्णालये आणि आरोग्य केंद्रांमधील हजारो पदे गेल्या अनेक वर्षांपासून रिक्त आहेत. आता या रिक्त पदांची भरती करण्यासाठी महापालिकेने हालचाली सुरू केल्या आहेत. महानगरपालिकेच्या एकूण आस्थापना अनुसूचीमध्ये 1,45,573...