डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ (BAMU Exam) अंतर्गत झालेल्या विविध परीक्षांचे निकाल अद्याप जाहीर न झाल्याने हजारो विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. विद्यापीठाने ऑक्टोबर २०२४ ते जानेवारी २०२५ या कालावधीत घेतलेल्या १७९ अभ्यासक्रमांच्या परीक्षेत तब्बल ३.५५ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. मात्र, अनेक विषयांचे निकाल अद्यापही प्रतीक्षेत आहेत, तर उन्हाळी सत्र परीक्षांचे वेळापत्रक जाहीर...